गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2023
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2022 (16:14 IST)

Shani 2023 मध्ये शनी देवाच्या कृपेने या राशींच्या लोकांचे भाग्य उजळेल

शनि देव 30 वर्षांनंतर 2023 मध्ये राशी परिवर्तन करुन कुंभ राशीत प्रवेश करत आहे. शनीचे राशी परिवर्तन महत्तवाचे असते. शनी कर्मांप्रमाणे परिणाम देणारे देव आहे. ज्योतिष शास्त्रानुसार 2023 या वर्षी शनी राशी परिवर्तन काही राशींच्या जातकांसाठी शुभ सिद्द होणार आहे. जाणून त्या राशींबद्दल ज्यांचे भाग्य उजळणार आहे- 
 
मकर
मकर राशीसाठी 2023 मध्ये शनीचा राशी बदल खूप खास मानला जात आहे. ज्योतिष शास्त्राच्या तज्ज्ञांच्या मते या राशीच्या लोकांसाठी शनीचे गोचर वरदानापेक्षा कमी नसेल. या दरम्यान शनिदेवाच्या कृपेने आर्थिक स्थिती सुधारेल. व्यावसायिकांना विशेष आर्थिक लाभ होईल. नवीन नोकरीची संधी मिळू शकते. कुटुंबात शुभ कार्य पार पडतील. एकूण 2023 हे वर्ष मकर राशीसाठी खूप शुभ असणार आहे.
 
मिथुन
या राशीच्या लोकांनाही शनिदेवाची विशेष कृपा लाभणार आहे. खरं तर 30 वर्षांनंतर शनीच्या राशीत बदलामुळे या राशीच्या लोकांच्या जीवनात विशेष बदल पाहायला मिळू शकेल. या काळात नवीन नोकरीची ऑफर मिळेल. व्यवसायात आर्थिक प्रगतीच्या भरपूर संधी मिळतील. वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळू शकतो. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित वाद मिटतील. शिवाय नशीबही साथ देईल. नोकरी बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी शनिदेव उपयुक्त ठरतील.
 
वृषभ
ज्योतिष शास्त्राप्रमाणे 2023 मध्ये शनिदेव वृषभ राशीवर कृपा करतील. त्यामुळे नोकरी-व्यवसायात बरीच प्रगती दिसून येईल. यासोबतच जीवनाच्या इतर क्षेत्रातही सकारात्मक बदल होतील. नोकरीत बढती आणि उत्पन्न वाढण्याचीही शक्यता आहे. याशिवाय जे नोकरीसाठी प्रयत्न करतील, त्यांना चांगली नोकरी मिळू शकते.