शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 जानेवारी 2020 (16:19 IST)

कृषी आयटीआय सुरू होणार: अजित पवार

औद्योगिक क्षेत्रात वाढलेलं डिजिटलायझेशन, ऑटोमेशन, दररोज विकसित होणारे तंत्रज्ञान, जागतिक उद्योगाची आजची गरज लक्षात घेऊन राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (आयटीआय) प्रशिक्षणात मुलभूत बदल करण्यात येणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.  
 
आगामी तीन वर्षांत आयटीआय कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील सर्व आयटीआय संस्थांचा चेहरामोहरा बदलला जाणार आहे. त्यासाठी 12 टक्के निधी शासनाच्या कौशल्य विकास कार्यक्रमाद्वारे तर उर्वरित 88 टक्के निधी खासगी संस्थांच्या माध्यमातून वस्तू व प्रशिक्षण सेवेद्वारे उपलब्ध होणार आहे. सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यामध्ये या गोष्टींचा आढावा घेण्यात आला.