मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 2 जून 2020 (14:26 IST)

'आम्हाला 'कोरोना ग्रॅज्युएट' तर संबोधले जाणार नाही ना?'

आम्हाला 'कोरोना ग्रॅज्युएट' तर संबोधले जाणार नाही ना? अशी शंका विद्यार्थ्यांच्या मनात असल्याच्या भावना भाजपचे नेते आणि माजी शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पत्राद्वारे कळवल्या.  
 
"कोरोना ग्रॅज्युएट अशा अशा नव्या बिरुदावलीने तर आम्हाला ओळखले जाणार नाही ना? एटीकेटी असलेल्या 40% विद्यार्थ्यांना नापास करणार का?" अशा भावना विद्यार्थ्यांच्या मनात असल्याचं शेलार म्हणाले.
 
"पदवीच्या अंतिम वर्ष विद्यार्थ्यांचे हित आणि आरोग्याची काळजी घेणे योग्यच आहे. त्यासोबत त्यांचे शैक्षणिक आरोग्यही सांभाळले गेले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या मनात भयगंड निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे वेळीच देऊन सरकारने विद्यार्थ्यांना चिंतामुक्त करावे, ही आमची विनंती," असं शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय.
 
दुसरीकडे, विद्यापीठाच्या अंतिम परीक्षा रद्द करण्याचा निर्णय कुलगुरूंचं अनुकूल मत विचारात न घेताच झाल्याची बातमी दिलीय.
 
राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंची व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली होती. या बैठकीत उशिरा का होईना, पण परीक्षा घेण्यात यावी असे मत कुलगुरूंकडून मांडण्यात आले होते. मात्र यानंतरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला.