गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 21 मे 2019 (11:51 IST)

मध्य प्रदेश सरकार पाडण्यासाठी भाजपचे प्रयत्न, बहुमत सिद्ध करण्यासाठी तयार असल्याचा कमलनाथ यांचा दावा

मध्य प्रदेशातील काँग्रेसप्रणीत कमलनाथ सरकार अल्पमतात आल्याचा दावा भाजपने केला आहे. एक्झिट पोलचे आकडे प्रसिद्ध झाल्यानंतर केंद्रात पुन्हा भाजपचं सरकार येणार हे स्पष्ट झालं आहे. त्यानंतर लगेचच भाजपनं मध्य प्रदेशमधील सरकार पाडण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.  
 
दरम्यान, मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आपण विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी तयार आहोत, असं जाहीर केलं. सरकार पाडण्यासाठी भाजप धडपडत असल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे.
 
गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेशात काँग्रेसनं २३०पैकी ११४ जागा जिंकल्या. बहुमत सिद्ध करण्यासाठी पक्षाला ११६ जागांची गरज होती ती बहुजन समाज पक्षाचे दोन आणि समाजवादी पक्षाचा एक आमदार यांच्या जोरावर भागली आहे. भाजपला १०९ जागा मिळाल्या होत्या.