कार्यकर्त्यांनो चुकीचे वागाल तर मी वाचवायला येणार नाही- इम्तियाज जलील
"माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या मर्यादेत राहावे. तुम्ही चुकीचे वागलात तर मी वाचवायला येणार नाही", असं मत औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केलं आहे.
लोकसभा निकालानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
निवडणूक निकालादिवशी काही युवकानी गोंधळ केला होता. "माझ्या कार्यकर्त्यांमुळे कोणाला त्रास झाला असेल तर मी माफी मागतो," असंही त्यांनी म्हटलं आहे.
"शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी आता राजकारण बंद करून शहराच्या विकासासाठी सोबत यावं. माझे कार्यकर्ते चुकीचे काम करत असतील तर मला सांगा, मी दोनशे टक्के कारवाई करेन," असंही ते पुढे म्हणाले.