बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

देशाची अर्थव्यवस्था डबघाईला असताना शेअर बाजारात तेजी कशी?- अरविंद सुब्रमण्यम

देशाची अर्थव्यवस्था सातत्याने घसरत आहे. देशभरात महागाई वाढू लागली असताना शेअर बाजारात उत्साह कसा काय? हे मोठे कोडे माझ्यासमोर आहे असे उद्गार माजी आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी काढले. 
 
अरविंद सुब्रमण्यम 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात आर्थिक सल्लागारपदी होते. इंडियन इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट अहमदाबाद इथल्या सेंटर फॉर बिहेव्हिअर सायन्स इन फायनॅन्सच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.
 
या केंद्रात होणारं संशोधन मला पडलेलं कोडं सोडवण्याचा प्रयत्न करतील. त्यांच्या अभ्यासात मला देशाची अर्थव्यवस्था का घसरत आहे आणि शेअर बाजार कसा वरती जात आहे या शंकेचं निरसन होईल.
 
नोकऱ्यांवर परिणाम झाला आहे. बँकेत पैसे ठेऊनही त्याचं व्याज मिळत नाही. त्यामुळे पैसे गुंतवावे तरी कसे असा सगळ्यांना प्रश्न पडला आहे. परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी सरकार प्रयत्न करतंय मात्र अजूनही काही महिने अत्यंत अडचणीचे असल्याचं सुब्रमण्यम यांनी म्हटलं आहे.