शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019 (11:44 IST)

चहा प्रकरणावरील आरोपांमागे दृष्ट हेतू - अनुष्का शर्मा

भारतीय क्रिकेट निवड समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावर्षी झालेल्या विश्वचषकादरम्यान अनुष्का शर्माला चहा सर्व्ह केल्याचा आरोप माजी क्रिकेटपटू फारूख इंजिनिअर यांनी केला होता. यावर स्पष्टीकरण देताना हा आरोप दृष्ट हेतूने लावल्याचं अनुष्का शर्मानं म्हटलं आहे.
 
चहा प्रकरणावरून अनुष्का शर्माला ट्रोल करण्यात आलं होतं. त्यानंतर तिने ट्विटरवर आपली बाजू स्पष्ट केली आहे. अनुष्का शर्मा म्हणाली, "दृष्ट हेतूंनी हे आरोप केले जात आहेत. आपल्या सोयीप्रमाणे सत्य स्वीकारलं जातं. माझा पती विराटच्या कामगिरीबाबत मला नेहमीच दोषी ठरवण्यात आलं होतं. भारतीय क्रिकेटशी संबंधित गोष्टींसाठी विनाकारण मला दोषी सिद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात येतो," असं अनुष्का म्हणाली. ही बातमी द हिंदू या इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे.