1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified शुक्रवार, 21 मे 2021 (16:51 IST)

‘शेरनी' जूनमध्ये ओटीटीवर

विद्या बालनचा बहुप्रतीक्षित ’शेरनी' जून महिन्यात अॅामेझोन प्राईमवर रिलीज होणार आहे. ‘शेरनी'च्या निर्मात्यांनी ट्विट करून ही घोषणा केली आहे. ट्विट पोस्टमध्ये दाखवलेल्या ‘शेरनी'च्या पोस्टरमध्ये विद्या बालनचा करारी, उग्र चेहरा दिसतो आहे.
 
आणखी एका ‘फोटोमध्ये विद्या हातामध्ये सॅटेलाईट फोन  घेतलेली दिसते आहे. तिचा चेहरा गनच्या पॉईंटर रडारमध्ये दिसतो आहे. तिच्यावर लक्ष ठेवणार्यांनी तिच्यावर नेम धरला असल्याचा अर्थ यातून सहज लक्षात येतो. शरद सक्सेना, मुकुल चढ्ढा, विजयराज, इला अरुण, बिजेंद्र काला आणि नीरज काबी हे ‘शेरनी'तील अन्य कलाकार असणार आहेत. ‘शेरनी' या नावातूनच विद्याचा रोल संघर्ष करणार्याब आक्रमक महिलेचा असणार आहे, हे लक्षात येते. त्याचप्रमाणे विद्या एका फॉरेस्ट ऑफिसरच्या रोलमध्ये दिसणार आहे. वन्यजीव आणि माणसामधील संघर्षाची किनार असलेल्या या सिनेमात वन्यप्राण्यांच्या रक्षणासाठी केलेला संघर्ष बघायला मिळणार आहे. यावर्षी फ्रेब्रुवारीमध्ये विद्याने या रोलमधील पोस्टर रिलीज करून या सिनमेची माहिती दिली होती. डर्टी पिक्चर नंतर एकदम हटके रोल करण्याची संधी पुन्हा तिच्या वाट्याला आली आहे.