रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 10 ऑगस्ट 2020 (18:40 IST)

माजी Miss India World नताशा सुरीलाही झाली कोरोनाची लागण

अभिनेत्री आणि माजी Miss India World नताशा सुरी (Natasha Suri) हिला कोरोनाची लागण झाली आहे. नताशाने PTIला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली आहे. कोरोनाची काही लक्षणे दिसल्याने आपण हॉस्पिटलमध्ये जाऊन टेस्ट केली ती (Corona Positive)पॉझिटिव्ह आल्याचं तिने सांगितलं. त्यामुळे घरातच क्वारंटाइन झाल्याची माहिती तिने दिली आहे. कुटुंबातल्या इतर सदस्यांचीही टेस्ट करण्यात येणार असल्याची माहितीही तिने दिली.

नताशा सुरी  म्हणाली, 3 ऑगस्टला मी पुण्याला काही कामानिमित्त गेले होते. जातांना सर्व काळजी घेतली होती. मात्र पुण्याहून परत आल्यानंतर मला ताप आला. घश्यातही खव खव होत होतं. त्यामुळे मी टेस्ट केली. टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचं कळाल्यानंतर मी घरातच क्वारंटाइन झाले आहे.

कोरोनाची लागण (Corona Positive) झाल्यामुळे आता सर्व गोष्टी पुढे ढकलाव्या लागत असल्याची माहितीही तिने आहे. या आधीही बॉलिवूडमधल्या अनेक दिग्गजांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातून बहुतांश जण हे बरे होऊन परतले आहेत.

मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यातच बॉलिवूडमध्ये सिने कलाकारांना कोरोनाची लागण झाल्यामुळे चिंतेचं वातावरण पसरलं होतं. त्यातच संजय दत्तला शनिवारी संध्याकाळी अचानक श्वसनाचा त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे तातडीने लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र संजय दत्तच्या दोनही चाचण्या निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.