गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 5 डिसेंबर 2018 (08:56 IST)

'झिरो' तील गाण्यात सलमान आणि शाहरूख एकत्र

सलमान खान आणि शाहरूख खान एकत्र 'झिरो' सिनेमातून पहायला मिळणार आहे. या सिनेमात सलमान खान एका गाण्यात शाहरूखसोबत एक जबरदस्त जुगलबंदी करताना दिसणार आहे. या गाण्याची सुरूवात एका सीनने झाली आहे ज्यामध्ये शाहरूख खान कतरिनाला Kissकरत आहे. किसनंतर शाहरूख खान खूप खूष दिसत असून सरळ नाचायला सुरूवात करतो. या गाण्याचा अंदाज बघता शाहरूखला डान्स करताना बघून सलमान खान स्वतःला रोखू शकला नाही. आणि तो देखील स्टेजवर नाचायला लागतो. सलमान आणि शाहरूख यांच्यात जुगलबंदी पाहायला मिळेल.
 
या गाण्याची कोरिओग्राफी गणेश आचार्य आणि रेमो डिसोझाने केली आहे. या गाण्याला अजय - अतुलने संगीत दिलं असून हे गाणं इर्शाद कामिलने लिहिलं आहे. तसेच हे गाणं सुखविंदर - दिव्या कुमार यांनी गायलं आहे.