शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

जेष्ठ संगीतकार मोहम्मद जहूर खय्याम यांचे 92 व्या वर्षी निधन

छातीत संक्रमण आणि न्यूमोनियामुळे खय्याम नावाने लोकप्रिय असलेले जेष्ठ संगीतकार मोहम्मद जहूर खय्याम यांचे 92 व्या वर्षी निधन झाले. त्यांना 28 जुलैला मुंबईच्या सुजय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची स्थिती सुधारण्याऐवजी आणखीनच खालावत गेली. डॉक्टरांनी सांगितले की, आज उपचारादरम्यान त्यांना ह्रदय विकाराचा झटका आला आणि रात्री 9.30 वाजता त्यांचे निधन झाले.
 
काही दिवसांपूर्वी खय्याम यांच्या अत्यंत जवळ असलेले गझल गायक तलत अजीज यांनी ते आजारी असल्याची माहिती दिली होती. त्यांनी सांगितले की, 28 जुलैला ते आपल्या घरात पडले त्यामुळे त्यांना तत्काळ सुजय रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांनी त्यांना फुप्फुसात संसर्ग होता. तेव्हापासून ते स्पेशलिस्ट डॉक्टरांच्या निगराणीत होते.
 
1953 पासून करिअरची सुरुवात केली
पंजाबच्या राहो गावात राहणाऱ्या खय्याम यांनी संगीतकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात 1953 मध्ये केली. त्याच वर्षी आलेल्या 'फिर सुबह होगी' चित्रपटातून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. खय्याम यांनी आपल्या करिअरमध्ये निवडक गाणे केले. चार दशकांच्या करिअरमध्ये त्यांनी खूप कमी, पण अतिशच चांगल्या प्रकारचे गाणे संगीतबद्द केले. 2007 मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी आणि 2011 मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळाला होता. 'फिर सुबह होगी' चित्रपटाशिवाय त्यांनी 'कभी कभी',‌' उमराव जान', 'थोड़ी सी बेवफाई', 'बाजार', 'नूरी', 'दर्द', 'रजिया सुल्तान', 'पर्वत के उस पार', 'त्रिशूल' सारखे चित्रपट केले.