विद्या बालन प्रसिद्ध गणितज्ञ शकुंतला देवींच्या बायोपिकमध्ये
अभिनेत्री विद्या बालन आता प्रसिद्ध गणितज्ञ शकुंतला देवींच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. अनु मेनन हा सिनेमा दिग्दर्शित करणार आहेत. विक्रम मल्होत्रांची निर्मिती असलेला हा बायोपिक २०२० च्या उन्हाळ्यात रिलीज होणार असल्याचं म्हटल जातंय. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श आणि खुद्द विद्या बालनच्या ट्विटवरून विद्या बालन शकुंतला देवींची प्रमुख भूमिका साकारत असल्याच स्पष्ट झालंय.
शकुंतला देवींचा जन्म १९२९ मध्ये बंगळूरू मध्ये झाला. लहानपणीच त्यांच्या वडिलांना त्यांच्या अफाट बुद्धिमत्तेची प्रचिती आली. त्यांनी गणिताबरोबर ज्योतिषशास्त्रावर सुद्धा अनेक पुस्तकं लिहिली आहेत. १९८२ साली गिनीज बुक ऑफ रेकॅार्डने त्यांच्या कामाची दखल घेतली.