मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. थोडं आंबट थोडं तिखट
Written By
Last Updated : शुक्रवार, 17 डिसेंबर 2021 (16:49 IST)

हिवाळ्यात बनवा चवीष्ट आणि आरोग्यदायी हे 2 प्रकाराचे रायते

हिवाळ्यात भरलेले पराठे खायला आवडत असेल तर या पराठ्यांसोबत दही किंवा रायता खायला नक्कीच आवडेल. या पराठ्यांसोबत तुम्ही विविध प्रकारचे रायते खाऊ शकता. हे रायते चविष्ट असण्यासहआरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहेत. चला तर मग जाणून घ्या काही रायत्याच्या रेसिपीबद्दल. 
 
1 बथुआ रायता
हिवाळ्यात विविध प्रकारच्या हिरव्या भाज्या येऊ लागतात. यापैकी एक म्हणजे बथुआ. आपण बथुआपासून रायता बनवू शकता तसेच पराठे देखील बनवू शकता. हे करण्यासाठी, प्रथम बथुआ स्वच्छ करा आणि फक्त त्याची पाने काढून टाका. आता ही पाने पाण्याने नीट धुवून घ्या. धुऊन झाल्यावर कुकरमध्ये ठेवा आणि 4 ते 5 शिट्ट्या घेऊन उकळा. चांगली उकळी आल्यानंतर ते थंड करून गाळून घ्या आणि पाणी बाजूला ठेवा. आता हे मिक्सरमध्ये टाकून चांगले बारीक करून घ्या, याची गुळगुळीत पेस्ट तयार करा. नंतर दही चांगले फेणून त्यात  बथुआ , मीठ, काळे मीठ, चाट मसाला, जिरे पूड घालून सर्व्ह करा.
 
2 पुदिना रायता
पुदिना रायता बनवायला खूप सोपा आहे. हे करण्यासाठी, सर्व प्रथम पुदीना चांगले स्वच्छ करा, यासह तुम्हाला थोडी हिरवी कोथिंबीर लागेल. कोथिंबीर -पुदिना मिक्सरमध्ये टाकून त्याची चांगली पेस्ट तयार करा. आवश्यकतेनुसार त्यात पाणी घाला. दह्यामध्ये पेस्ट घाला आणि चांगले मिसळा. आता त्यात मीठ आणि मिरी पावडर घालून सर्व्ह करा.