राज्यात २४ हजार १३६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले
राज्यात सध्या एकाबाजूला नव्या कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत घट होताना दिसत असून त्याबरोबर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र दुसऱ्या बाजूला कोरोना रुग्ण मृत्यू होण्याच्या संख्येत चढउतार होताना दिसत आहे. मंगळवारी २४ हजार १३६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ६०१ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५२ लाख १८ हजार ७६८वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ९० हजार ३४९ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील सध्याचा मृत्यूदर १.६१ टक्क्यांवर पोहोचला आहे.
मंगळवारी ३६ हजार १७६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ५२ लाख १८ हजार ७६८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.७६ टक्के झाले आहे. सध्या राज्यात ३ लाख १४ हजार ३६८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ३५ लाख ४१ हजार ५६५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५६ लाख २६ हजार १५५ (१६.७७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २६ लाख १६ हजार ४२८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २० हजार ८२९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
दरम्यान मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार ३७ नव्या रुग्णांची वाढ झाली असून ३७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. तर १ हजार ४२७ जण रुग्ण बरे होऊन घरी गेले. मुंबईतील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६ लाख ९९ लाख ९०४वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १४ हजार ७०८ जणांचा मृत्यू झाला असून ६ लाख ५५ हजार ४२५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.