शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 2 एप्रिल 2020 (11:15 IST)

मुंबईत तीन दिवसांच्या तान्ह्या बाळाला करोनाची लागण

करोनाच्या प्रार्दुभावाचा धक्कादायक प्रकार मुंबईत समोर आला आहे. येथे आईसह तीन दिवसांच्या तान्ह्या बाळाला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
 
चेंबूर परिसरातील ही घटना असून करोनाग्रस्तांसाठी नव्यानं रिकाम्या करण्यात आलेल्या वॉर्डमध्ये आई आणि बाळाला ठेवण्यात आल्यानं त्यांना करोनाची लागण झाल्याचा आरोप बाळाच्या वडीलांनी केला आहे. याव्यतिरिक्त सदर नर्सिंग होमच्या रिसेप्शनिस्टलादेखील करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आहे.
 
महिलेच्या पतीने ‍दिलेल्लया माहितीनुसार 29 मार्च रोजी त्याच्या पत्नीची प्रसुती झाली. नंतर पत्नीला आणि तान्ह्या बाळाला एका प्रायव्हेट खोलीत हलवण्यात आलं. नंतर दोन तासाने पुन्हा दुसरीकडे जाण्यास सांगितले. 24 तासांनंतर डॉक्टरांनी फोनवर सांगितले की ऐआम्हाला ज्या खोलीत हलवण्यात आलं होती ती खोली करोनाग्रस्तांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. तसंच त्या ठिकाणी कोणीही डॉक्टर तपासण्यासाठी येणार नाही. 
 
पतीने म्हटले की आम्हाला या गोष्टीची कल्पना असते तर तर आम्ही स्वत:ला सॅनिटाईझ केलं असतं. तसेच रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी पत्नीमध्ये करोनाची कोणतीही लक्षणं दिसत नव्हती असंही त्यांनी सांगितले. 
 
टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. सध्या तिघांना मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.