गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 मे 2020 (09:02 IST)

६०५९ रुग्ण बरे होऊन घरी परतले – आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २७ हजार ५२४ झाली आहे. १६०२ नविन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ५१२ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ६०५९ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २० हजार ४४६ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.
 
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ४० हजार १४५ नमुन्यांपैकी २ लाख १२ हजार ६२१ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २७ हजार ५२४ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३ लाख १५ हजार ६८६ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १५ हजार ४६५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 
आज राज्यात ४४ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या १०१९ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील २५, नवी मुंबईत १०, पुण्यात ५,औरंगाबाद शहरात २, पनवेलमध्ये १ तर कल्याण डोंबिवलीमध्ये १ मृत्यू झाला आहे. नवी मुंबईत नमूद करण्यात आलेले मृत्यू दि. १४ एप्रिल ते १४ मे या कालावधीतील आहेत. आज झालेल्या मृत्यूंपैकी ३१ पुरुष तर १३ महिला आहेत.
 
झालेल्या ४४ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २१ रुग्ण आहेत तर २० रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ३ जण ४० वर्षांखालील आहेत. या ४४ रुग्णांपैकी ३४ जणांमध्ये ( ७७ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.