राज ठाकरे यांच्या कुटुंबीयांनी घेतली कोरोना लस
देशात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना आणि सहव्याधी असलेल्या ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्यांना लस देण्यात येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कुटुंबीयांनीही कोरोनाची लस टोचून घेतली आहे.
राज ठाकरे यांच्या मातोश्री कुंदा ठाकरे आणि बहीण जयवंती देशपांडे यांनी कोरोनाची लस टोचून घेतली आहे. मुंबईतील बीकेसी येथील कोरोना केंद्रात त्यांनी लस घेतली. यावेळी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे सोबत उपस्थित होत्या.