बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 24 जुलै 2021 (08:12 IST)

नाशिक जिल्ह्यात मागील २४ तासात : जिल्ह्यात १०८ कोरोना मुक्त : ४२० कोरोनाचे संशयित : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.५५ %

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मोठ्याप्रमाणात थैमान घातले होते.परंतु अनेक महिन्यांनंतर नाशिक जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होऊन ही संख्या ५० च्या आत आली आहे.नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी  ४९ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.तर नाशिक शहरात  रुग्णसंख्येमध्ये घट होऊन नव्या रुग्णांची संख्या २० झाली आहे. तर जिल्ह्यात १०८ जण कोरोना मुक्त झाले.जिल्ह्यात कोरोनामुळे ३ जणांचा मृत्यू झाला.मात्र १८८४ जणांचे कोरोनाचे अहवाल येणे प्रतीक्षेत आहे.  

जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ९७.५५ % झाली आहे. जवळपास ४२० संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले असून नाशिक जिल्ह्यात  कोरोनामुळे जिल्ह्यात एकूण ३ जणांचा मृत्यू झाला.ग्रामीण भागात ०२ जणांचे मृत्यू झाले आहे.तर नाशिक शहरात ०१ ,मालेगाव महापालिका हद्दीत ० रुग्णाचा तर नाशिक बाहेरील ० रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
 
नाशिक शहरात २० तर ग्रामीण भागात २६ मालेगाव मनपा विभागात ०१ तर बाह्य ०२ अशा नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. नाशिक शहरात हा रेट ९७.९९ झाला टक्के आहे.सद्य स्थितीत जिल्ह्यात एकूण १३६६ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण ६४० जण उपचार घेत आहेत.जिल्ह्यात कोरोनाचे एकूण १८८४ अहवाल येणे प्रगतीपथावर आहे.अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली.
 
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ९६.८८ %,नाशिक शहरात ९७.९९ %, मालेगाव मध्ये ९६.७२ % तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९७.६१ %आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७.५५ %इतके आहे.