सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 5 मे 2020 (11:45 IST)

भारतीय महिला हॉकी संघाने जमा केले 20 लाख रुपये

भारतीय महिला हॉकी संघाने कोरोनाविरुद्धच्या महामारीच्या लढाईत मदतीसाठी 20 लाख रुपयांची रक्कम जमा केली आहे. भारतीय संघाने 18 दिवसांमध्ये फिटनेस चॅलेंजद्वारे ही रक्कम जमा केली आहे. तीन मे रोजी फिटनेस चॅलेंज संपले. या आव्हानाद्वारे एकूण 20 लाख रुपये जमा करण्यात आले आहे. 
 
जमा झालेला पैसा दिल्ली येथील एनजीओ उदय फाउंडशेनला मदत म्हणून दिला जाणार आहे. या पैशांचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारचे रूग्ण, प्रवासी, कामगार आणि झोपड्यांमध्ये राहणार्या् लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केला जाणार आहे. 
 
भारताची कर्णधार राणी रामपाल हिने सांगितले की, आम्हाला चांगली प्रतिक्रिया मिळाली. लोकांनी विशेषकरून भारतीय हॉकी प्रेमींनी जगभरातून या आव्हानात सहभाग घेतला आणि आपले योगदान दिले. त्याबद्दल मी भारतीय संघाकडून त्या सर्वांचे आभार मानू इच्छिते ज्यांनी गरिबांच्या मदतीसाठी यामध्ये आपले योगदान दिले.
 
या फिटटनेस चॅलेंजमध्ये संघातील सदस्यांना तंदुरूस्तीशी निगडित वेगवेगळे काम दिले जात होते. प्रत्येक दिवशी खेळाडू नवीन आव्हान देत होते. त्याचा स्वीकार करण्यासाठी सोशल मीडिया हँडलवर शंभर रूपये देण्यासाठी दहा लोकांना टॅग केले जात होते.