गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By

नगरमध्ये आणखी ९ जणांना कोरोनाची लागण

देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत चालला आहे. आज सकाळी महाराष्ट्रातील अहमदनगर येथे कोरोना व्हायरसचे 6 नवे रुग्ण सापडले होते. आता आणखी ९ जण आढळले आहेत. त्यामुळे नगरमध्ये कोरोनाचे आता एकूण १७ रुग्ण झाले आहेत.
 
नगरमधील 51 रुग्णांचा अहवाल पुण्यातील लॅबमध्ये पाठवण्यात आला होता. आज हा अहवाल प्राप्त झाला. त्यात या ९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आता महाराष्ट्रात एकूण ४१६ रुग्ण झाले आहेत.