ब्रिटनच्या आरोग्य मंत्र्यांना कोरोनाची लागण
ब्रिटनच्या आरोग्य मंत्री नदीन डॉरिस यांना कोरोनाची लागण झाली आहे. नदीन यांनी जारी केलेल्या एका स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे की, 'मी पुष्टी करते माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे आणि मी घरामध्ये स्वत:ला वेगळं ठेवलं आहे.' नदीन यांना कोरोनाची लागण झाली कशी? हे आरोग्य विभागाचे अधिकारी शोधत आहेत.
कोरोनाला सामोरे जाण्यासाठी कायदेशीर तरतुदी तयार करण्यात मदत करणाऱ्या नदीन डोरिस ब्रिटनच्या पहिल्या नेत्या आहेत. कोरोना विषाणूला नोटिफायबल आजार असणाऱ्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. यावर नदीन यांनी स्वाक्षरी केली आहे. त्याचदिवशी नदीन आजारी होत्या. आता येथे कोरोनाविरोधात कंपन्या विमा घेऊ शकतात.