शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. वाचकांची पत्रे
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 मार्च 2022 (12:27 IST)

3 शाळकरी मित्रांचा ओढ्यात बुडून मृत्यू

शाळा सुटल्यावर मुले घरी आली नाहीत, चौकशी साठी पालकांनी त्यांची शोधाशोध केलं असता त्यांची दप्तरे ओढ्याजवळ आढळून आल्याचे कळले. ओढ्यात बुडून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या  3 शाळकरी मुलांचा दुर्देवी  मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जालना जिल्ह्याच्या परतूर तालुक्यातील आष्टी जवळ संकनपुरी येथे घडली आहे. अजय रघुनाथ टेकाळे (13), करण बाळासाहेब नाचण (10) आणी उमेश बाबासाहेब नाचण असे या शाळकरी मुलांची नावे आहेत. हे तिघे शाळा सुटल्यावर सकाळी 10:30 वाजता ओढ्यात पोहोण्यासाठी गेले असता त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यांचे दप्तर ओढ्याच्या बाहेर असल्यामुळे गावकरीना त्यांचा शोध लागला. मुलं पाण्यात बुडालेली पाहून काहींनी पाण्यात उद्या टाकल्या आणि तिघाचें मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. आपल्या लेकरांचे मृतदेह पाहून कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली  आहे.