शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. मराठी निबंध
Written By
Last Modified: शनिवार, 11 डिसेंबर 2021 (23:20 IST)

मराठी निबंध :"वेळेचे महत्व "

असं म्हणतात की गेलेली वेळ पुन्हा येत नाही. वेळेला धनापेक्षाही अधिक मौल्यवान मानले गेले आहे. यशस्वी लोकांच्या यशामागचे रहस्य आहे की ते नेहमी वेळेचा सदुपयोग करतात. आपण गमावलेला पैसा पुन्हा कमावू शकतो.पण गमावलेला वेळ परत मिळू शकणार नाही. म्हणून वेळेचे महत्व समजावे.  
काही लोक त्यांच्या पैशाला वेळेपेक्षा जास्त महत्त्व देतात, तथापि, सत्य हे आहे की वेळेपेक्षा अधिक मौल्यवान काहीही नाही. हीच वेळ आहे जी आपल्याला संपत्ती, समृद्धी आणि आनंद देते. जगात सर्व काही विकत घेऊ शकतो पण वेळ कोणीही विकत घेऊ शकत नाही. काही लोक असे आहेत जे आपला वेळ वाया घालवत आहे.  आपण काय करत आहोत, कसं करत आहोत. याचा विचार देखील करत नाही. विद्यार्थी जीवनात वेळेचा योग्य वापर केला तर जीवनात यश नक्कीच मिळते.
विद्यार्थ्यांनी आपल्या वेळेचा सदुपयोग केला पाहिजे. आपल्या मोकळ्या वेळेत शिक्षकांकडून मार्गदर्शन घ्यावे. आपल्या देनंदिनीचे टाईमटेबल बनवून वेळेचा सदुपयोग केल्याने यश नक्कीच मिळतो. विद्यार्थ्यांनी वेळेचे भान राखून आपल्या लक्षाचे निर्धारण करावे. 
स्वामी विवेकानंद म्हणतात ''एका वेळी एकच काम करावे, व ते काम करताना इतर सर्व विसरून आपले लक्ष त्यात लावून काम करावे.'' ज्यांना वेळेचे महत्व समजले तोच आयुष्यात यशस्वी होतो. 
म्हणूनच वेळ वाया न दवडता आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करायला हवा. या मुळे आपल्याला यश नक्कीच मिळेल.