गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. फिफा विश्वचषक
Written By
Last Modified: मंगळवार, 6 डिसेंबर 2022 (23:25 IST)

FIFA WC: पेनल्टी शूटआऊटमध्ये स्पेनचा पराभव करत मोरोक्कोचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

fifa
कतारमध्ये सुरू असलेल्या फुटबॉल वर्ल्ड कपच्या सातव्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये मोरोक्कोने पेनल्टी शूटआउटमध्ये स्पेनचा पराभव केला. निर्धारित 90 मिनिटांत एकही गोल न झाल्याने सामना अतिरिक्त वेळेत गेला. अतिरिक्त वेळ संपल्यानंतर स्कोअर 0-0 असा राहिला. त्यानंतर सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये झाला.
मोरोक्कोने विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. त्यांनी प्री-क्वार्टर फायनलमध्ये 2010 च्या चॅम्पियन स्पेनचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव केला.मोरोक्कोचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश झाला आहे. 
 
Edited by - Priya Dixit