गणपतीच्या चार भुजा हे संदेश देतात
गणपती ही केवळ ज्ञान व बुद्धीची देवता नव्हे, तर ती शौर्याचीदेखील देवता आहे. गणपतीचे चित्र म्हणजे चार हात, दोन मोठे हत्तीचे कान, वळणदार सोंड, गोलाकार पोट आणि शेला-पितांबर हे सगुण रूप मनात येते. तसेच त्यांच्या चारी हातात चार वस्तू असतात. त्यांच्या एका हातात अंकुश, दुसर्या हातात पाश, तिसर्या हातात मोदक आणि चौथा हात आशीर्वाद अश्या मुद्रेत असतो. तर जाणून घ्या गणपतीचे हे चार हात काय संदेश देतात ते...
1. पहिली भुजा : त्यांच्या हातात अंकुश सूचक आहे संयमाच्या. आपल्या इच्छांवर संयम, ताबा असणे गरजेचे आहे.
2. दुसरी भुजा : त्यांच्या दुसर्या हातात पाश सूचक आहे की प्रत्येक व्यक्तीच्या स्वत:च्या आचरण आणि व्यवहारात संयम आणि नियंत्रण असणे आवश्यक आहे, ज्यामुळे जीवन संतुलित असावं. पाश नियंत्रण, संयम आणि दण्ड याचे प्रतीक आहे.
3. तिसरी भुजा : त्यांच्या तिसर्या हातात मोदक असतं. मोदकाचा अर्थ मोद अर्थात आनंद देणारा, ज्याने आनंदाची अनुभूती होते, संतोष प्राप्ती होते. तन आणि मनात संतोष असणे आवश्यक आहे... तेव्हाच जीवनाचा खरा आनंद मिळू शकतो.
तर मोदक हळू-हळू खाल्ल्याने त्याचा स्वाद आणि गोडवा अधिक आनंद देतं आणि शेवटी मोदक संपल्यावर आपण तृप्त होऊन जाता. त्या प्रकारे बाह्य आणि वरवर दिसणारं ज्ञान व्यक्तीला आनंदी करू शकत नाही परंतु ज्ञानाचा खोलात सुख आणि यशाचा गोडवा लपलेला असतो.
4. चौथी भुजा : ही भुजा भक्तांना आशीर्वाद देते. जी व्यक्ती आपल्या कर्मांचे फलरूपी मोदक देवाच्या हातात ठेवते, त्यांना प्रभू आशीर्वाद देतात. हाच चौथ्या हाताचा संदेश आहे.