शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. विठ्ठल
Written By

Ashadhi Ekadashi 2023 कधी आहे आषाढी एकादशी ?

Ashadhi Ekadashi 2023
Ashadhi Ekadashi 2023 आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी म्हणतात. हा वारकरी सांप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे. याला देवशयनी एकादशी देखील म्हणतात. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी आणि भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोणातून या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे.
 
2023 आषाढी एकादशी किती तारखेला आहे?
यावर्षी म्हणजेच 2023 साली 29 जून गुरुवार रोजी देवशयनी आषाढी एकादशी 2023 आहे. 
 
आषाढी एकादशी 2023 शुभ मुहूर्त
आषाढी एकादशी उपवास सोडण्याची वेळ : 30 जून रोजी दुपारी 13:48:15 ते 16:35:37
कालावधी : 2 तास 47 मिनिटे
हरी वासरा समाप्ती क्षण : 30 जून रोजी 08:22:14
 
आषाढी एकादशी 2023 का केली जाते?
असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागावर झोपी जातात. धार्मिक मान्यतेनुसार मनुष्याचं एक वर्ष हे देवांची एक अहोरात्र असते. दक्षिणायन ही देवांची रात्र असते आणि उत्तरायण हा दिवस असतो. आषाढ महिन्यातील कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होते आणि दक्षिणायनाला सुरुवात होते. म्हणून आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी किंवा हरि शयनी एकदशी असे देखील म्हटले जाते. यानंतर भगवान विष्णू कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकदशीला म्हणजेच प्रबोधनी एकादशीला जागे होतात. हा काळ चातुर्मास म्हणून ओळखला जातो. या दिवसाला खूप महत्त्व आहे म्हणून या दिवशी विष्णूला प्रसन्न करण्यासाठी उपासना आणि आराधना केली जाते.
 
आषाढी एकादशी 2023 महत्तव
आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते असा समज आहे. म्हणून सर्व व्रतांमध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पंढरपूरला अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा पुरावा मिळतो तसेच वैकुंठभूमीच्या आधीपासूनच पंढरपूर अस्तित्वात आले असा लोकांचा समज आहेत. म्हणूनच पृथ्वीवरील सर्वात पुरातन अशा तीर्थक्षेत्राचा पंढरपूर असा उल्लेख केला गेला आहे.