अस्तानंतर आता लग्नसराईवर लॉकडाऊनचे संकट; २२ एप्रिलपासून मुहूर्त

marriage
Last Modified मंगळवार, 13 एप्रिल 2021 (08:22 IST)
गेल्या तीन महिन्यांच्या अस्त कालावधीनंतर येत्या २२ एप्रिलपासून विवाह मुहुर्तांना प्रारंभ होत आहे. मात्र, गेल्या तीन महिन्यातील अस्त आणि आता पुन्हा कोरोना लॉकडाऊनची छाया लग्नसराईवर आहे. त्यामुळे वधू-वरांच्या पालकांसह सारेच मोठ्या चिंतेत अडकले आहेत.
गुरू शुक्राच्या अस्त काळामध्ये साखरपुडा, सुपारी फोडणे, लग्न निश्चित करण्याआधीचे विधी करता येऊ शकत होते. मात्र, कोरोनाच्या निर्बंधांमुळे त्याववरही पाणी पडले. यंदाचे विवाह मुहुर्तांची माहिती देत आहेत, पंडित पंत.
विवाह मुहुर्ताच्या तारखा व महिने पुढीलप्रमाणे
या तिन्ही महिन्यात अनुक्रमे गुरू व शुक्राचा अस्त असल्याने विवाह मुहूर्त नाहीत.
२२ एप्रिल, २४ एप्रिल, २५ एप्रिल, २६ एप्रिल, २७ एप्रिल, २८ एप्रिल, २९ एप्रिल, ३० एप्रिल असे आठ मुहूर्त आहेत.
१ मे, २ मे, ७ मे, ८ मे, ९ मे, १३ मे, १४ मे, १५ मे असे आठ मुहूर्त आहेत.
३ जून, ४ जून, ५ जून, १६ जून, १९ जून, २० जून, २२ जून, २३ जून आणि २४ जून असे नऊ मुहूर्त आहेत.
१ जुलाई, २ जुलै, ७ जुलै, १३ जुलै, १५ जुलै असे पाच मुहूर्त आहेत.
या तीन महिन्यात विवाह मुहूर्त नाहीत.
१५ नोव्हेंबर, १६ नोव्हेंबर, २० नोव्हेंबर, २१ नोव्हेंबर, २८ नोव्हेंबर, २९ नोव्हेंबर, ३० नोव्हेंबर असे सात विवाह मुहूर्त आहेत.
१ डिसेंबर, २ डिसेंबर, ६ डिसेंबर, ७ डिसेंबर, ११ डिसेंबर, १३ डिसेंबर असे सहा मुहूर्त आहेत.
अशा पद्धतीने डिसेंबर २०२० ते डिसेंबर २०२१ एकूण ४८ विवाहमुहूर्त आहेत.
गुरु म्हणजे विवाह कार्यामधील प्रमुख ग्रह आहे. विवाह कार्यातील प्रत्येक विधीला गुरूचा आशीर्वाद असणे गरजेचे असते. गुरु हा पिवळ्या रंगाचे प्रतिनिधित्व करतो. म्हणूनच लग्नापूर्वी पिवळ्या रंगाची हळद लावली जाते. वधू तसेच वरांकडे परस्परांची ज्येष्ठ मंडळी हळद घेऊन येतात व ती वधू-वरांना लावतात. त्याचपद्धतीने विवाहातील अक्षतांना देखील हळद व कुंकू लावले जाते. विवाहातील प्रत्येक विधीमध्ये गुरुचे प्रतिनिधीत्व करणारी हळद प्रामुख्याने वापरली जाते. विवाहाप्रसंगी गुरूचा आशिर्वाद लाभणे तसेच वधुवरांच्या कुंडलीतील गुरुबळ लाभणे हे प्रकारे दीर्घकाळ वैवाहिक आयुष्याचे द्योतक मानले जाते. त्याचप्रमाणे शुक्र हा ग्रह वैवाहिक सुखाचा कारक असल्याने विवाह प्रसंगी शुक्राचा आशीर्वाद लाभणे हे दीर्घकालिन वैवाहिक सुखाचे प्रतिक मानले जाते. म्हणून विवाह प्रसंगी गुरु व शुक्र या ग्रहांचा आशिर्वाद लाभणे महत्त्वाचे असते, असे पंडित पंत यांनी सांगितले आहे.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

Mitra Saptami : मित्र सप्तमी का व्रत, भगवान सूर्याला ...

Mitra Saptami : मित्र सप्तमी का व्रत, भगवान सूर्याला प्रसन्न करण्यासाठी अशी पूजा करा
सूर्य देव महर्षी कश्यप आणि अदिती यांचा पुत्र असल्याचे म्हटले जाते. सूर्यदेवाच्या ...

मार्गशीर्ष गुरुवार व्रत कथा

मार्गशीर्ष गुरुवार व्रत कथा
मार्गशीर्षच्या दिवसांमध्ये एक व्रतकथा आवर्जून वाचली जाते. या व्रत कथेमागे श्रद्धेचा भाग ...

श्री दत्तक्षेत्र कडगंची

श्री दत्तक्षेत्र कडगंची
औदुंबर, नृसिंहवाडी, गाणगापूर अशी पवित्र दत्तस्थाने सगळ्यांनाच परिचित आहेत, पण त्याशिवायही ...

चंपाषष्ठी संपूर्ण माहिती

चंपाषष्ठी संपूर्ण माहिती
श्री खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. मुख्यत्वे करून महाराष्ट्र आणि कर्नाटक या ...

तीर्थक्षेत्र जेजुरी

तीर्थक्षेत्र जेजुरी
जेजुरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील एक शहर आहे. हे खंडोबाच्या ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...