शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

तुळशीपाशी दिवा लावण्यापूर्वी हे लक्षात असू द्या

1 तुळशीपाशी दिवा लावण्यापूर्वी अक्षतांचे आसन अर्थात दिव्याखाली अक्षता ठेवाव्या. त्यावर आपल्या इच्छेनुसार तेल किंवा तुपाचा दिवा लावावा. देवी लक्ष्मी अक्षतांचे आसन ग्रहण करते असे मानले आहे म्हणून अक्षता ठेवल्याने देवी विराजमान होते.
 
2 अक्षता शुद्धतेचे प्रतीक आहे. म्हणून अक्षता वापरल्याने दारिद्र्य दूर होतं आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होते.
 
3 अक्षताविना कोणतीही पूजा अपुरी मानली गेली आहे. म्हणून दिव्याखाली अक्षता नसल्याने आराधना पूर्ण होत नसते असे शास्त्र आहे.