शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

यांना सन्मान दिला तर जग जिंकलं समजा

नारदपुराण आणि धर्म शास्त्रात अश्या अनेक पुस्कात अश्या कामांबद्दल वर्णन आढळत ज्यामुळे मनुष्याने कमावलेले सर्व पुण्य केवळ एका क्षणा‍त नष्ट होतं.
 
गायीचा अपमान
हिंदू धर्मात तसेच नैसर्गिक संरचनेत देखील गायीला देवतुल्य मानले गेले आहे. पुराणांमध्ये गायीला नंदा, सुनंदा, सुरभि, सुशीला आणि सुमन म्हटले गेले आहे. कृष्ण कथेत अंकित सर्व पात्र कोणत्या न कोणत्या कारणामुळे शापग्रस्त्र होऊन जन्म घेतलेले होते, असे मानले गेले आहे.
 
गायीला कामधेनू आणि गौ माता मानले गेले आहे. गाय मनुष्याला दूध, दही, तूप, गोबर-गोमूत्र रुपात पंचगव्य प्रदान करते. सृष्टीची संरचना देखील पंचभूताने झालेली आहे. हे पिंड, ब्रह्माण्‍ड, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाशा या रुपात पंचभूतांच्या पाच तत्त्वांनी निर्मित आहे. या पंचतत्त्वांचे पोषण आणि यांचे शोधन गोवंशाने प्राप्त पंच तत्त्वांनी होते. म्हणून गायीला पंचभूताची माता देखील म्हटले गेले आहे.
 
देवीय पुराण आणि हिंदू धर्मातील सर्व शास्त्रांमध्ये गायीचा अपमान करणार्‍यांची निंदा केली गेली आहे. गायीचा अपमान करणे ईश्वरीय दृष्टीत पाप मानले गेले आहे ज्याचे प्रायश्चित नाही. पुण्य तीर्थ दर्शन करुन किंवा यज्ञ करुन कमावलेले पुण्य केवळ गोमाताची सेवा करुन देखील प्राप्त करता येऊ शकतं.
 
तुळस
विष्णूपुराण आणि हिंदू धर्माच्या सर्व ग्रंथात वर्णित आहे की तुळशीचा अपमना ईश्वर सहन करु शकत नाही. तुळशीचा सर्वात मोठा अपमान म्हणजे घरात तुळस असल्यावर तुळशीची पूजा न करणे. ज्या घरात तुळस आहे ते स्थळ देवीय दृष्टी पूजनीय आहे आणि त्या घरात कोणत्याही प्रकाराचा आजार येऊ शकत नाही. धार्मिक कार्यांमध्ये पूजनीय तुळस विज्ञान दृष्ट्या अत्यंत फायदेशीर औषधी आहे.
 
तूळशीचे झाड घर आणि मंदिरात लावलं जातं. सोबतच तुळशीचे पानं प्रभू विष्णूंचा अर्पित केले जातात. जेव्हाकि गणपती आणि महादेवाला तुळस अर्पित करणे वर्जित आहे.
 
वैदिक पुराणाप्रमाणे तुळशीचे पूजन करणार्‍यांना स्वर्ग प्राप्ती होते.
तुळशीचा दररोज जल अर्पित केल्याने व्यक्तीचे आयुष्य वाढतं.
शास्त्रांप्रमाणे एकादशी, रविवार आणि सूर्य आणि चंद्र ग्रहण काळात तुळस तोडू नये.
तसेच आवश्यकता नसली तर उगाच तुळशीचे पान तोडू नये, असे केल्याने व्यक्तीला दोष लागतो.
 
गंगाजल
सर्वांना माहित आहे की गंगा अवतरण स्वर्गाहून पृथ्वीवर झाले आहेत. हिंदू धर्मात गंगा नदीला आईचा मान देण्यात आला आहे. विष्णुपुराण आणि शिवपुराण सांगण्यात आले आहे की गंगाजलचा अपमान केल्याने व्यक्तीने आविष्यभर कमावलेले पुण्य क्षणात नाहीसं होतं. म्हणून गंगाजलाचा सन्मान करावा. अनेक धार्मिक अनुष्ठानात गंगाजल वापरलं जातं. आपल्या घरात देखील गंगाजल असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा:
गंगा जल ठेवलेल्या खोलीत चुकून मास मदिराचे सेवन करु नये. असे केल्याने गृहदोष लागतं.
गंगाजल कधीही प्लास्टिकच्या बाटलीत ठेवू नये. प्लास्टिकच्या भांड्यात ठेवलेले गंगाजल पूजेत अशुद्ध मानलं जातं. गंगाजल नेहमी तांबा, चांदी किंवा इतर धातूच्या पात्रात ठेवावे.
घरातील वाईट शक्ती, नजर दोष आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी घरातील चारीबाजूला गंगाजल शिंपडावे. गंगाजलाला हात लावण्यापूर्वी शुद्धतेचे लक्ष ठेवावे. हात स्वच्छ धुऊन किंवा अंघोळ झाल्यावर गंगाजलाल नमस्कार करुनच वापरावे.