बुधवार, 13 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

श्री भक्तविजय अध्याय ४

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीगोपीजनवल्लभाय नमः ॥    ॥
जय जय विश्वव्यापका जगदुद्धारा ॥ मदनताता श्यामसुंदरा ॥ नीलग्रीवमानसप्रिया ॥ सर्वेश्वरा गोविंदा ॥१॥
जय गोकुळवासिया गोरक्षका ॥ यशोदेचिया निजबाळका ॥ विधिजनका कंसांतका ॥ विश्वरक्षका गोपते ॥२॥
जय द्वारकावासी शारंगधरा ॥ सायुज्यदानीं अति उदारा ॥ समुद्रतनयेच्या प्रियकरा ॥ विश्वेश्वरा विश्व पते ॥३॥
जय राधिकामानसरंजना ॥ वैकुंठविहारी जगज्जीवना ॥ पूतनांतका कालियामर्दना ॥ भवभंजना श्रीहरे ॥४॥
जय पुंडलीकवरदा रुक्मिणीरमणा ॥ द्रौपदीलज्जानिवारणा ॥ भक्तवत्सला करुणाघना ॥ विजयी राणा रघुपते ॥५॥
जय भक्तवत्सला पंढरीनाथा ॥ विश्वव्यापका लक्ष्मीकांता ॥ तुवां साह्य होऊनि अनंता ॥ वदवीं ग्रंथा मजलागीं ॥६॥
आतां ऐका श्रोते सज्जन ॥ क्षीरसागरीं नारायण ॥ उद्धवशुकांसी पाचारून ॥ म्हणे अवतार घेणें मृत्युलोकीं ॥७॥
ते म्हणती पयोब्धिवासा ॥ आम्ही न जाऊं कीं गर्भवासा ॥ अयोनिसंभव हृषीकेशा ॥ जन्म देईं आम्हांसी ॥८॥
ऐसें ऐकोनि जगज्जीवन ॥ बाल्य दिधलें त्यांकारण ॥ शुक्तिकेचे पोटीं घालून ॥ वर्षते घनीं टाकिले ॥९॥
एक पडिला भागीरथींत ॥ एक पडिला भीमरथींत ॥ प्रवाहें वाहत येत ॥ स्मरण करित तें ऐका ॥१०॥
शिंपला पडिला भागीरथींत ॥ तो राम राम स्मरण करित ॥ दुजा पडिला भीमरथींत ॥ तो विठ्ठल विठ्ठल म्हणत निजछंदें ॥११॥
रामभजन करी तो शुक ॥ उद्धव पांडुरंगउपासक ॥ प्रवाहीं वाहतां देख ॥ काय कौतुक वर्तलें ॥१२॥
दामाजी शिंपी वैष्णवजन ॥ परम भाविक पुण्यपावन ॥ भक्तिज्ञान वैराग्य पूर्ण ॥ त्याचे ठायीं असती ॥१३॥
चंद्रभागेचें करूनि स्नान ॥ पांडुरंगाचें करी पूजन ॥ ऐसा सारूनि नित्यनेम ॥ यावरी भोजन करीतसे ॥१४॥
गोणाई त्याची कांता ॥ परम भाविक पतिव्रता ॥ पंढरींत राहाती उभयतां ॥ श्रीजगन्नाथा आठवूनी ॥१५॥
पोटीं नाहीं पुत्रसंतान ॥ गोणाई म्हणे पती लागून ॥ तुम्हीं पांडुरंगापाशीं जाऊन ॥ एक पुत्र मागावा ॥१६॥
दामशेटी म्हणे तूं अज्ञान ॥ आपण वृद्ध दोघें जण ॥ देव कोठूनि संतान ॥ आपणांकारणें देईल ॥१७॥
किडीनें खादलें असतां बीज ॥ पेरितां सिद्ध नव्हे काज ॥ तेवीं संतान मागतां तुज ॥ नाहीं लाज सर्वथा ॥१८॥
वर्षाऋतु गेलिया सरोन ॥ कैसा इच्छितां वर्षेल घन ॥ तेवीं तूं इच्छिसी पुत्रसंतान ॥ लज्जा मनीं न धरितां ॥१९॥
आंबियाचे वृक्षासी ॥ फळें न येती श्रावणमासीं ॥ तेवीं तूं इच्छिसी संतानासी ॥ लाज मानसीं न धरितां ॥२०॥
स्नेहसूत्र सरतां जाण ॥ दीपक सरसावी अज्ञान ॥ तेवीं तूं इच्छिसी संतान ॥ लज्जा मनीं न धरितां ॥२१॥
कांता म्हणे प्राणनाथा ॥ बुद्धिसोढ मज ठेवितां ॥ परी सर्वांवरिष्ठ ईश्वरी सत्ता ॥ तुम्ही नेणते मज कळलें ॥२२॥
रामावतारीं रघुनंदन ॥ समुद्रीं तारिले पाषाण ॥ आम्हां वृद्धां देतां पुत्रसंतान ॥ संकट तयासी कोणतें ॥२३॥
वत्सहरण केलें विधीनें ॥ तेव्हां स्वयें जाहला गाई गोपजन ॥ वृद्धांसी देतां पुत्रसंतान ॥ संकट तयासी कोणतें ॥२४॥
दामशेटी म्हणे कांतेसी ॥ कातां जाऊनि राउळासी ॥ त्वां इच्छा धरिली आहे जैसी ॥ ती देवासी सांगेन ॥२५॥
मग महाद्वारासी जाऊन ॥ देवासी केलें साष्टांग नमन ॥ म्हणे कांतां इच्छी पुत्रसंतान ॥ होईं प्रसन्न श्रीहरे ॥२६॥
ऐसें बोलोनि वचन ॥ निद्रा आली न लागतां क्षण ॥ स्वप्नीं येऊनि जगज्जीवन ॥ म्हणे पुत्रदान तुज दीधलें ॥२७॥
उदयीक भीमातीरीं जाण ॥ जासील करावया स्नान ॥ वाहत येईल पुत्रसंतान ॥ सत्वर घेवून येईं तें ॥२८॥
उद्धवाचा अवतार जाण ॥ कीर्तीनें भरील त्रिभुवन ॥ विश्वोद्धारक वैष्णव परम ॥ माझें निजनामधारक जो ॥२९॥
ऐसें पाहतांचि स्वप्न ॥ घरासी गेले त्वरेंकरून ॥ कांतेपासीं वर्तमान ॥ जाहलें तैसें सांगितलें ॥३०॥
दुसरें दिवसीं दामशेटी ॥ सत्वर आला भीमातटीं ॥ स्नान करूनि उठाउठी ॥ नित्यनेम सारिला ॥३१॥
तों भीमातटीं वाहत ॥ शिंपला अकस्मात देखिला येत ॥ दामशेटीनें जातजा ॥ घेतला सत्वर तेधवां ॥३२॥
उकलोनि पाहतां तये क्षणीं ॥ तों लावण्यबाळ देखिला नयनीं ॥ जैसें मातेच्या उदरांतूनी ॥ येचि क्षणीं उपजलें ॥३३॥
देखोनि चिंतावलें मन ॥ म्हणे यासी स्तनपान करवील कोण ॥ तैसाचि वस्त्रांत गुंडाळून ॥ आला घेऊन घरासी॥३४॥
कांतेसी म्हणे ते वेळां ॥ तुज हा देवें पुत्र दिधला ॥ गोणाईनें सत्वर घेतला ॥ तों पान्हा फुटला निजस्तनीं ॥३५॥
वृद्धपणीं आला पान्हा ॥ आश्चर्य वाटलें दोघां जणां ॥ बाळक न्हाणोनि तये क्षणा ॥ प्रेमें पान्हा पाजिला ॥३६॥
प्रसन्न करूनि पुरुषोत्तमा ॥ पुत्र मागितला मेघश्यामा ॥ म्हणोनि नाम ठेविलें नामा ॥ अद्भुत प्रेमा तयावरी ॥३७॥
दिवसेंदिवस थोर जाहला ॥ तों काय वर्तलें ते वेळां ॥ दामशेटी हाटासा गेला ॥ नामा पाठविला देउळासी ॥३८॥
गोणाईनें नैवेद्य देऊनी ॥ राउळासी पाठविला तये क्षणीं ॥ नामयासी म्हणे जननी ॥ नैवेद्य दावूनि येईं का ॥३९॥
सर्व पूजा घेऊनि त्वरित ॥ नामा आला देवळांत ॥ मग देवासी घालोनि दंडवत ॥ पूजा करीत निजांगें ॥४०॥
स्नान घालोनि सत्वर ॥ मग नेसविला पीतांबर ॥ चंदन पुष्पें उपचार ॥ धूप दीप दाखविला ॥४१॥
नैवेद्याचें ताट आणून ॥ पुढे ठेविलें नामयानें ॥ हात जोडोनि देवासी म्हणे ॥ आतां भोजन करावें ॥४२॥
नामयाचें चित्तीं हाचि भाव॥ नित्य नैवेद्य भक्षी देव ॥ चित्तीं नाठवें संदेह ॥ हाचि भाव तयाचा ॥४३॥
म्हणे जय जय कृपावंता ॥ उशीर जाहला पूजेकरितां ॥ म्हणोनियां पंढरीनाथा ॥ राग चित्ता आला कीं ॥४४॥
दामशेटी तुझा निजभक्त ॥ हाटासी गेला आजि त्वरित ॥ नैवेद्य दाखवावया येथ ॥ मजला निश्चित पाठविलें ॥४५॥
तूं नैवेद्य जेविसी न आतां ॥ तरी मजवरी कोपेल माता ॥ काय अन्याय जगन्नाथा ॥ न जेविसी आतां म्हणोनि ॥४६॥
पाषाणमूर्ति जेवील कैसी ॥ हा विकल्प नाहीं निजमानसीं ॥ नामा स्फुंदे उकसाबुकसीं ॥ म्हणे हृषीकेशी जेवीं कां ॥४७॥
देखोनि नाम्याचा शुद्ध भाव ॥ प्रसन्न जाहला देवाधिदेव ॥ नामयासी समजावूनि केशव ॥ आलिंगन देतसे ॥४८॥
नाम्यानें नैवेद्य आणिला ॥ तो प्रीतीनें देव जेविला ॥ हरि म्हणे नामयाला ॥ झणीं कोणासी सांगसील ॥४९॥
नमस्कार करूनि देवासी ॥ नामा आला निजगृहासी ॥ माता म्हणे तयासी ॥ नैवेद्य कोणासी दिधला ॥५०॥
नामा म्हणे वो जननी ॥ नैवेद्य जेविले चक्रपाणी ॥ तो दामशेटी दुसरे दिनीं ॥ बाजाराहूनि पातला ॥५१॥
कांतेसी पुसोनियां मात ॥ ऐकिला सकळ वृत्तांत ॥ दामशेटी जाहला विस्मित ॥ नवल अद्भुत वाटलें ॥५२॥
नामयासी म्हणे ते क्षणीं ॥ कैसा जेविला चक्रपाणी ॥ राउळासी जाऊनि ये क्षणीं ॥ मजलागून दाखवीं ॥५३॥
पूजा घेवोनि त्या अवसरा ॥ दोघे आले महाद्वारा ॥ नमस्कार करूनि जगदुद्धारा ॥ पूजा सत्वर आरंभिली ॥५४॥
षोडशोपचारें करूनि पूजा ॥ धूप दीप अर्पिले ओजा ॥ नामा म्हणे गरुडध्वजा ॥ जेवीं आतां सत्वर ॥५५॥
नामयासी म्हणे जगजेठी ॥ सवें आला कीं दामशेटी ॥ मीं कदा न पडें याचे दृष्टी ॥ तुजसी भेटी देईन ॥५६॥
नामा म्हणे देवा तूं कपटी ॥ पित्यासी नेदीं म्हणसी भेटी ॥ कृत्रिमपण माझिये दृष्टीं ॥ लीला जगजेठी दाविसी ॥५७॥
ऐकोनि नामयाचें वचन ॥ हांसों लागला जगज्जीवन ॥ दामशेटीस भेट देऊन ॥ केलें भोजन तेधवां ॥५८॥
पिता म्हणे नामयासी ॥ तूं जन्मलासी माझिये वंशीं ॥ म्हणोनियां हृषीकेशी ॥ भेटला मजसी निजप्रीतीं ॥५९॥
यापरी करूनि समाधान ॥ देवासी घातलें लोटांगण ॥ नामयासी हातीं धरून ॥ निजमंदिरीं पातला ॥६०॥
कांतेसी सांगितला वृत्तांत ॥ सत्य जेविला वैकुंठनाथ ॥ नाम्यास म्हणों नये आप्त ॥ असे निजभक्त देवाचा ॥६१॥
गोणाई म्हणे ते वेळां ॥ हा अयोनिसंभव उपजला ॥ देवें कृपा करून तुम्हांला ॥ पुत्र म्हणोनि दिधला ॥६२॥
ऐसें समाधान करूनि चित्तीं ॥ नामयावरी धरिली प्रीती ॥ सोयरीक पाहूनि निश्चितीं ॥ लग्न केलें तयाचें ॥६३॥
नामा थोर होतांचि जाण ॥ पुत्र जाहला तयाकारण ॥ बारशासाठीं जगज्जीवन ॥ अहेर घेऊन पैं आले ॥६४॥
गोणाई पुसे देवासी ॥ पुत्र जाहला नामयासी ॥ त्याचें नांव हृषीकेशी ॥ काय ठेवूं सांग पां ॥६५॥
ऐसें ऐकूनि वचन ॥ काय बोले जगज्जीवन ॥ नारायण ठेवूनि नाम ॥ खेळवीं सप्रेम आवडीं ॥६६॥
नरनारी मेळवूनि ब्राह्मण ॥ मग मांडिलें पुण्याहवाचन ॥ नामयासी अहेर जगज्जीवन ॥ निजप्रीतीनें देतसे ॥६७॥
साडी चोळी राजाईसी ॥ पेहरण कुंची बाळकासी ॥ अर्पूनियां हृषीकेशी ॥ निजमंदिरासीं पैं गेले ॥६८॥
गोणाई म्हणे नामयाकारण ॥ आम्ही तों वृद्ध दोघेंजण ॥ तूं करितोसी हरिचिंतन ॥ धरून ध्यान अहर्निशीं ॥६९॥
नामीं रूपीं जडलें चित्त ॥ देहावरी नससी क्षणमात्र ॥ हृदयीं धरिला पंढरीनाथ ॥ त्याणें अंत पुरविला ॥७०॥
संसारीं लागतसे सर्व कांहीं ॥ एक पुत्र तुं जाहलासी विदेही ॥ आता म्यां करावें कायी ॥ ऐसें गोणाई बोलिली ॥७१॥
आणिक वैष्णव बहु आहेती ॥ ते प्रपंच परमार्थ चालविती ॥ त्यांविरहित तुझी स्थिती ॥ ऐसें मजप्रती वाटतें ॥७२॥
लेंकुरें बाळें संसारीं ॥ अन्नवस्त्र संकीर्ण घरीं ॥ पिशुन हांसती दुराचारी ॥ कैसी परी करावी ॥७३॥
ऐसें बोलतां निजमाया ॥ अनुताप जाहला नामया ॥ महाद्वारीं जाऊनियां ॥ लोटांगण घातलें ॥७४॥
म्हणे पंढरीनिवासा श्रीहरी ॥ मज कां घातलें संसारीं ॥ दुःखरूप भवसागरीं ॥ कां मुरारे मोकलिलें ॥७५॥
ऐकूनि नामयाचीं करुणावचनें ॥ म्हणे तुज गांजिलें आजि कवणें ॥ आलिंगन देऊनि प्रीतीनें ॥ पुसिले नयन तयाचे ॥७६॥
नामा म्हणे देवराया ॥ गोणाई गांजिती माया ॥ मी आठवितों तुझिया पाया ॥ करीं तूं छाया कृपेची ॥७७॥
देव म्हणे नामयासी ॥ तुवां असावें मजपासीं ॥ मग माया मोह तुजसीं ॥ कदाकाळीं स्पर्शेना ॥७८॥
तूं तंव माझा अंशपूर्ण ॥ मी तरी तुझें स्वरूप जाण ॥ जेवीं सागरांतूनि निघालें लवण ॥ दिसे अभिन्न ज्ञानदृष्टीं ॥७९॥
सूर्य आणि तयाचीं किरणें ॥ भिन्न न होती वेगळेपणें ॥ तैसा तुझा माझा प्राण ॥ एकत्र जाण नामया ॥८०॥
दीप आणि प्रकाशज्योती ॥ एकत्र असतां भिन्न दिसती ॥ तैसी तुझी माझी प्रीती ॥ असे निश्चितीं नामया ॥८१॥
गोडी आणि साखर ॥ न ये निवडितां साचार ॥ तेवीं माझा तुझा विचार ॥ अभिन्नपणें नामया ॥८२॥
रत्न आणि त्याची ज्योती ॥ अभिन्न असतां भिन्न म्हणती ॥ तैसी तुझी माझी प्रीती ॥ जाण चित्तीं नामया ॥८३॥
कीं अमूल्य जैसें मुक्ताफळ ॥ वेगळा म्हणती त्याचा ढाळ ॥ तैसाचि तूं भक्त प्रेमळ ॥ अभिन्न म्हणती नामया ॥८४॥
कीं तीर्थ आणि गंगाजळ ॥ वेगळें नव्हेचि सर्वकाळ ॥ तैसा अभिन्न मी घननीळ ॥ तुजसीं केवळ नामया ॥८५॥
कीं सुवर्ण आणि अलंकार ॥ वेगळे नव्हेचि साचार ॥ तैसा तुझा माझा विचार ॥ अभिन्नपणें नामया ॥८६॥
नाद निघाला घंटेंतून ॥ तो तया ठायींचि जाहला लीन ॥ तेवीं माझे ठायीं मिळून ॥ द्वैतखंडन करावें ॥८७॥
नामा म्हणे हृषीकेशी ॥ हें ज्ञान मजला काय सांगसी ॥ तुझें नाम असतां वाचेसी ॥ संसारदुःखासी कोण गणी ॥८८॥
हृदयीं बिंबलें तुझें रूप ॥ कोठें राहील भवताप ॥ तूं संसारीं असतां मायबाप ॥ न ये संताप दृष्टीसी ॥८९॥
तूं देव भक्त जाण ॥ मुखें करीन तुझें कीर्तन ॥ जन्मोजन्मीं हेंचि मागणें ॥ प्रेमदान मज देईं ॥९०॥
मोक्षसुख तूं थोर सांगसी ॥ तें न ये माझिया चित्तासी ॥ वचनें ऐकोनियां ऐसी ॥ हृषीकेशी हांसिन्नले ॥९१॥
रुक्मिणीसी म्हणे जगज्जीवन ॥ नामयासी आवडे रूप सगुण ॥ यासी सांगतां आत्मज्ञान ॥ समाधान नव्हे कीं ॥९२॥
ऐसें म्हणोनि हृषीकेशी ॥ नाम धरिला हृदयासीं ॥ आलिंगन देऊनि तयासी ॥ मग अपोटासीं धरियेला ॥९३॥
नामयासी म्हणे वैकुंठवासी ॥ तुझे घरींची नांदणूक कैसी ॥ ते सांगावी मजपासीं ॥ लज्जा मानसीं न धरितां ॥९४॥
ऐकोनि नामा बोले वचन ॥ तुझिया प्रसादें काय उणें ॥ तुमचें घर वैकुंठभुवन ॥ आम्हांसी मोडकें खोपट ॥९५॥
अष्टासिद्धि तुझिया दासी ॥ आमुचे धरीं वसती घुसी ॥ दिव्यांबरें तूं नेससी ॥ आमुच्या मुलांसी वस्त्र नाहीं ॥९६॥
तूं क्षीरसागरीं शेषशयन ॥ आम्हांस न मिळे तृणासन ॥ तुम्हांस थाळें कनकवर्ण ॥ आम्हांस पान जेवावया ॥९७॥
तुम्हांघरीं रौप्यसुवर्ण ॥ आमुचे विश्रांती तुझें नाम जाण ॥ ऐसें ऐकोनियां वचन ॥ मधुसूदन हांसले ॥९८॥
इकडे नामयाची कांता ॥ आपुलें घरीं करितां चिंता ॥ सासूस म्हणे मजभोंवता ॥ स्फटिक निर्मिला होता कीं ॥९९॥
वस्त्र फाटकें अति जीर्ण ॥ भक्षावयास न मिळे अन्न ॥ दरिद्र भोगावयाकारण ॥ तुमचे सदना मी आलें ॥१००॥
सेवा भक्ति करितों ज्याची ॥ तेणेंच पाठ घेतली आमुची ॥ संसाराची यावयाची ॥ वाट कैसी दिसेना ॥१॥
ऐसी नामयाची कांता ॥ घरीं करीत असतां चिंता ॥ करुणा आली पंढरीनाथा ॥ अनाथनाथा ते वेळीं ॥२॥
नामयासी न कळतां जगजेठी ॥ वाणी झाला केशवशेटी ॥ निजभक्तांची प्रीति मोठी ॥ पावे संकटीं लवलाहें ॥३॥
सुवर्णहोनांची भरून गोणी ॥ गरुडास म्हणे चक्रपाणी ॥ वृषभरूप तूं धरूनी ॥ चाल सदनीं नामयाच्या ॥४॥
द्रव्य घेऊनि हृषीकेशी ॥ वर्तमान पुसे लोकांसी ॥ मार्ग नामयाचे मंदिरासी ॥ कोणता मज सांगावा ॥५॥
ऐसें ऐकूनियां वचन ॥ ग्रामवासी हांसती जन ॥ नामयाघरीं नसतां अन्न ॥ पाहुणा कोण पातला ॥६॥
म्हणती पैल तें वृंदावन ॥ भोंवतें अपार तुळसीवन ॥ पताका शोभती प्रकाशमान ॥ तेंचि भवन नामयाचें ॥७॥
राजाईस म्हणे मुरारी ॥ पाहुणे आले तुझिया घरीं ॥ आतां बाहेर येऊन झडकरी ॥ द्यावें सत्वरी बैसावया ॥८॥
वचन ऐकतां कानीं ॥ राजाई चिंतावली मनीं ॥ पाहुणा आला असे कोठुनी ॥ फजितखोर कळेना ॥९॥
करितसे तयाची संपादणी ॥ काय बोलतसे त्यालागुनी ॥ घरीं नाहींत कीं घरधनी ॥ जावें परतोनि निजवाटे ॥११०॥
घरीं मिळाल्या शेजारिणी ॥ त्यांजवळ सांगे गार्‍हाणीं ॥ जीव घेतला पाहुण्यांनीं ॥ काय साजणी करावें ॥११॥
ऐका बाई नवलपरी ॥ अखंड साधु येती घरीं ॥ टाळ विणा घेऊनि करीं ॥ प्रेमभरें नाचती ॥१२॥
सांडोनि लज्जा मान लौकिक ॥ सांडोनि भेदाभेद देख ॥ हृदयीं धरूनि यदुनायक ॥ नाचती देख निजछंदें ॥१३॥
घरधनी सांगे मजलागुन ॥ संतांसी घालावें भोजन ॥ घरीं तिळभरी नसे अन्न ॥ त्यांजकारणें कळेना ॥१४॥
ऐसा संवाद श्रीहरी ॥ उभा ठाकून ऐकें द्वारीं ॥ राजाईस म्हणे मुरारी ॥ यावें बाहेरी सत्वर ॥१५॥
येरी पुसे द्वाराआडून ॥ तुम्ही कोठील असा कवण ॥ आपुलें सांगा नामाभिधान ॥ मजकारणें ये वेळे ॥१६॥
ऐकोनि म्हणे जगजेठी ॥ माझें नांव केशव शेटी ॥ आम्हांसी नामयाची प्रीत मोठी ॥ आलों भेटीस तयाचे ॥१७॥
तुमचे घरीं नाहीं अन्न ॥ ऐसें ऐकिलें वर्तमान ॥ नामा माझा मित्र जाण ॥ आणिले होन त्यालागीं ॥१८॥
ऐसें वचन ऐकोनि राजाई ॥ बाहेर आली ते समयीं ॥ बैसावयासी लवलाहीं ॥ आणोनियां दीधलें ॥१९॥
आधीं निष्ठुर बोलोनि वचन ॥ मग करीतसे सन्मान ॥ कौतुक देखोनि जगज्जीवन ॥ हास्यवदनें बोलती ॥१२०॥
म्हणे द्रव्य देखोनि मजकारणें ॥ आतां नम्र बोलतीस वचनें ॥ रिक्तपाणी याकारणें ॥ कोठें न जावें सर्वथा ॥२१॥
अहेरावांचोनियां जाणा ॥ न जावें कवणाचिया लग्ना ॥ द्रव्यावांचोनि राजदर्शना ॥ जाऊं नये सर्वथा ॥२२॥
कन्याभगिनींचे भेटीसी पाहीं ॥ रिक्तपाणी न जावें कोण्ही ॥ सोयरे पिशुन यांचें गृहीं ॥ विषमकाळीं न जावें ॥२३॥
रिक्तपाणी पर्वकाळीं ॥ तीर्थीं न जावें कदाकाळीं ॥ दर्शना देवाचे देउळीं ॥ रिक्तहातीं नव जावें ॥२४॥
साधुगुरूंच्या दर्शना जावें ॥ तरी तुलसीदल किंचित न्यावें ॥ मूठभरी पोहे सुदामदेवें ॥ आणिले भावें मजलागीं ॥२५॥
एवं आशाबद्ध अवघे जन ॥ मीही तैसाचि वर्तें जाण ॥ निरपेक्ष माझें भजन ॥ नामा एक करीतसे ॥२६॥
ऐसें म्हणोनि हृषीकेशी ॥ काय बोलती राजाईसी ॥ आतां माझे नामयासी ॥ झणीं न छळीं सर्वथा ॥२७॥
द्रव्य आणिलें गोणीभरी ॥ हें सांठवीं निजमंदिरीं ॥ सरोनि जातां निर्धारीं ॥ मज पाचारीं सत्वर ॥२८॥
नामयासी निरोप सांगा माझा ॥ आला होता मित्र तुझा ॥ अकोनि नामयाची भाजा ॥ अधोक्षजा काय बोले ॥२९॥
मी निष्ठुर बोलिलें तुम्हांप्रती ॥ म्हणोनि राग न धरावा चित्तीं ॥ घरधनी यांसी तुमची प्रीती ॥ हें मजप्रती कळेना ॥१३०॥
भोजन करूनि जावें त्वरित ॥ ऐकोनि म्हणती वैकुंठनाथ ॥ नामयावांचूनि मी सत्य ॥ नाहीं जेवीत सर्वथा ॥३१॥
ऐसें म्हणोनि ते वेळीं ॥ सत्वर चालिला वनमाळी ॥ जाऊनियां रुक्मिणीजवळी ॥ वर्तमान सर्व सांगितलें ॥३२॥
इकडे राजाईलागून ॥ चित्तीं वाटलें समाधान ॥ म्हणे सेवा केली धरधनीयान ॥ देव प्रसन्न जाहला कीं ॥३३॥
गोणी फोडोनि सत्वरी ॥ होन घेतले ओंटीभरी ॥ बाजारांत जाऊनि ते अवसरीं ॥ घातले पदरीं वाणियाचे ॥३४॥
जो जो पदार्थ संसरासी ॥ लागतसे तें तूं जाणसी ॥ तें सत्वर माझिया घरासी ॥ पाठवूनि देईं ये वेळे ॥३५॥
ऐसें म्हणोनि तयाप्रती ॥ घरासी आली सत्वरगती ॥ वाणी विस्मित जाहला चित्तीं ॥ म्हणे सह्य श्रीपती यांसी जाहला ॥३६॥
वस्त्रें भूषणें नानापरी ॥ घृत तांदूळ गूळ सामग्री ॥ पाठवूनि दिली तयाचें घरीं ॥ हर्ष अंतरीं न समाये ॥३७॥
गोणाई बाहेर गेली पाहीं ॥ तीस हें वर्तमान ठाऊक नाहीं ॥ धान्य मिळवूनियां कांहीं ॥ परतोनि धरा येतसे ॥३८॥
विचार करी निजमनीं ॥ नामा गेलासे रुसोनी ॥ आतां राउळासी जाऊनी ॥ समजावूनि आणावा ॥३९॥
ऐसें म्हणोनि ते अवसरीं ॥ सत्वर आली महाद्वारीं ॥ नमन करूनि गरुडपारीं ॥ मंडपाशेजारीं पैं आली ॥१४०॥
पुढें पाहतां निजदृष्टीसीं ॥ उभे देखिले हृषीकेशी ॥ नामा घातला पाठीसी ॥ गोणाईसी देखूनि ॥४१॥
गोणाई म्हणे जगजेठी ॥ इकडे पाहें करूनि दिठी ॥ नामयासी प्रीति लावूनि मोठी ॥ पाडिली तुटी संसारा ॥४२॥
तुझें संगतीनें गोविंदा ॥ याणें सांडिला धरधंदा ॥ संसारी भोगितो आपदा ॥ विषयस्वादा टाकुनी ॥४३॥
माया ममता टाकून ॥ याणें दृढ धरिले तुझे चरण ॥ संसारा पडतां उणेपण ॥ हांसती पिशुन आम्हांसी ॥४४॥
सांडोनियां देहबुद्धी ॥ उघडी भोगितसे समाधी ॥ तुवां लाविला अद्वैतबोधीं ॥ संसारबुद्धी नाठवे ॥४५॥
तुझे संगतीं जे लागले ॥ ते आपुल्याऐसे तुवां केले ॥ ते परतोनि संसारा आले ॥ नाहीं देखिलें ऐकिलें कीं ॥४६॥
मजसीं करून इष्टतुटी ॥ नामा घातला आपुले पाठीं ॥ धरीं कांता होतसे कष्टी ॥ करुणा जगजेठी तुज नये ॥४७॥
आमचा घात करूनि जाणा ॥ नामयाची तुज ये करुणा ॥ तुझी भीड रुक्मिणीरमणा ॥ मी धरींना ये वेळीं ॥४८॥
ममता धरूनियां मोठी ॥ नव मास म्यां वाहिला पोटीं ॥ निराशा केली जगजेठी ॥ पाडेली तुटी संसारा ॥४९॥
तूं उदार म्हणविसी आपणा ॥ तरी सांगें दिधलें काय कोणा ॥ तुझी कीर्ति जगज्जीवना ॥ माझिया मना नये कीं ॥१५०॥
पोहे घेऊनि मूठभरी ॥ सुदाम्यासी दिधली हेमपुरी ॥ दिधल्यावांचूनि मुरारी ॥ कोणा सत्वरीं न पावसी ॥५१॥
बलाढ्य देखोनि रावण ॥ मग फितविला बिभीषण ॥ त्याचे घराचा भेद घेऊन ॥ लंकादान दिधलें ॥५२॥
द्रौपदीस संकट पडतां जाण ॥ आधीं घेतलें भाजीपान ॥ मग ऋषींस घालोनि भोजन ॥ उदाहरण मिरविसी ॥५३॥
ऐसें तुझे हे अवगुण ॥ शेष शिणला करितां लेखन ॥ म्यां भीड धरिली म्हणोन ॥ तुझें देवपण राहिलें ॥५४॥
ऐकूनि गोणाईचें उत्तर ॥ हांसों लागला शारंगधर ॥ म्हणे तूं व्यर्थ आम्हांवर ॥ क्रोध साचार करितेसी ॥५५॥
माझे पायीं बळेंचि जडला ॥ वेदेही नामा तुझा वेडा ॥ आपुला असतां दाम कुडा ॥ परासीं झगडा कासया ॥५६॥
ममता धरूनियां पोटीं ॥ नामयासी पाहासी पुत्रदृष्टीं ॥ आम्हांस करून इष्टतुटी ॥ बोलसी होटॆएं अपशब्द ॥५७॥
तुझी ममता असेल काहीं ॥ तरी निजपुत्रासी घेऊन जाईं ॥ आम्हांवरी निमित्त पाहीं ॥ व्यर्थ कांहीं न ठेवीं ॥५८॥
मुळींच फळ देंटीं पिकलें ॥ वारा लागतां खालीं पडलें ॥ नामयाचें निमित्त भलें ॥ तैसें आलें मजवरी ॥५९॥
मी अज अव्यय अजित पूर्ण ॥ गुणातीत होतों जाण ॥ नामयाचे आवडीकारण ॥ साकार सगुण जाहलों कीं ॥१६०॥
नव्हतें आकाश वायु नीर ॥ नव्हती पृथ्वी तेज अनल ॥ नव्हते ब्रह्मा विष्णु हर ॥ निराकार जैं होतें ॥६१॥
तैचा जिवलग सांगाती ॥ नामयासी माझी अत्यंत प्रीती ॥ आतां तूं भांडसी कवणे रीतीं ॥ हें मजप्रति कळेना ॥६२॥
जैसीं वृक्षासी फळें आलीं ॥ माळियें तोडूनि नेलीं ॥ ज्याचीं त्यास नाहीं भोगलीं ॥ तुटी पडिली निजकर्में ॥६३॥
तेवीं मी वृक्ष जगदाकार ॥ प्रेमळ नामा अमृतफळ ॥ तोडून घेतलें त्वां तत्काळ ॥ त्याची तळमळ मज वाटे ॥६४॥
गोणाई म्हणे जगजेठी ॥ बहु थोर बोलसी गोष्टी ॥ खडे घालून माझे पोटीं ॥ इष्टतुटी करितोसी ॥६५॥
नानापरींचे कष्ट करूनी ॥ कुणबी पिकविती जैसी धरणी ॥ आयताचि राजा दंड करूनी ॥ होतसे धनी वांटिया ॥६६॥
तेवीं म्यां कष्ट करूनि फार ॥ नामा वाढवूनि केला थोर ॥ आयता धनी शारंगधर ॥ होसी साचार पुंडपणें ॥६७॥
ऐकोनि गोणाईचें वचन ॥ हांसोनि बोले जगज्जीवन ॥ म्हणे ईसी आतां बरवेपण ॥ समजावणें मज लागे ॥६८॥
नाहीं तरी अपकीर्ती ॥ माझी करील ही निश्चितीं ॥ ऐसें म्हणूनि रुक्मिणीपती ॥ उत्तर पुढती देतसे ॥६९॥
गोणाईसी म्हणे घननीळ ॥ तुझें सुकृत अति निर्मळ ॥ म्हणोनि पोटीं भक्त प्रेमळ ॥ आला तत्काळ तूझिया ॥१७०॥
कमलोद्भवसावित्रीचें पोटीं ॥ नारद वैष्णव जगजेठी ॥ तेवीं तूं आणि सभाग्य दामशेटी ॥ नामा पोटीं अवतरला ॥७१॥
कीं दैत्यवंशीं कयाधुउद्धरीं ॥ प्रल्हाद भक्त अवतार धरी ॥ तेवीं विष्णुदास तुझें उदरीं ॥ विश्वोद्धारी जन्मला ॥७२॥
कीं छपन्न कोटी यादवांत ॥ वैष्णववरिष्ठ उद्धव भक्त ॥ तेवीं शिंपियाचे वंशात ॥ नामा निश्चित अवतरला ॥७३॥
कीं सिद्ध साधु योगी जाण ॥ तयां वरिष्ठ अनसूयानंदन ॥ तेवीं तूं अभाग्य दिससी जाण ॥ नामा चिद्रत्न पुत्र तुझा ॥७४॥
कीं उत्तानचरण नृपती ॥ त्याची कांता ज्येष्ठ सुनीती ॥ ध्रुव पुत्र प्रसवे निश्चितीं ॥ वश मजप्रती केलें जेणें ॥७५॥
कीं अंजनी मातेचिय कुशीं ॥ हनुमंत जन्मला वानरवंशीं ॥ तैसाचि नामा सद्गुणराशी ॥ तुझे उदरासी आला कीं ॥७६॥
धन्य गोणाई तुझें भजन ॥ पोटासी आला वैष्णजवन ॥ तुझें भाग्य वर्णावें कोणें ॥ करविलें स्तनपान नामयासी ॥७७॥
नामा धरूनि निजउदरीं ॥ विश्रांति घेतली सेजेवरी ॥ तुझे भाग्याची थोरी ॥ मज निर्धारीं न वदवे ॥७८॥
भोजन करितां नामयासी ॥ सवें घेऊनि तूं जेविसी ॥ तुझिया सुकृताच्या राशी ॥ तूंचि जाणसी स्नेहाळे ॥७९॥
जो सर्वांवरिष्ठ अजित पूर्ण ॥ तो मी वर्णीं तुझे गुण ॥ ऐसी भाग्याची तूंचि धन्य ॥ नामा निधान पुत्र तुझे ॥१८०॥
गोणाई म्हणे जगज्जीवना ॥ विश्वव्यापका मनमोहना ॥ माझा मज देऊनि नामा ॥ भजनप्रेमा असों दे ॥८१॥
ऐसें ऐकूनि जगजेठी ॥ वरती करूनि पाहे दिठी ॥ नाम्यासी लावील प्रपंचवाटीं ॥ म्हणूनि कष्टी होतसे ॥८२॥
उगाचि राहतां जगज्जीवन ॥ गोणाईसी कळलें चिन्ह ॥ सर्वांवरिष्ठ तर्कज्ञान ॥ ऐसें सज्ञान बोलती ॥८३॥
चौदा विद्या अभ्यास करितां ॥ सकळ चातुर्य हातासी येतां ॥ तर्कज्ञान चित्तीं नसतां ॥ व्यर्थ सर्वथा जाणिजे ॥८४॥
राजसभेसी पांडित्य करणें ॥ न्यायनीति विचारणें ॥ सभा पाहूनि उत्तर देणें ॥ तरी तार्किकज्ञान असावें ॥८५॥
शरीरसंबंध करावयासी ॥ कीं व्यवहार करितां आणिकांसी ॥ पुस्तक वाचितां वाचकासी ॥ तार्किकज्ञान असावें ॥८६॥
इष्टत्व करावें कोणाप्रती ॥ निजगुज बोलतां एकांतीं ॥ पुस्तक लिहितां लेखकाप्रती ॥ तार्किकज्ञान असावें ॥८७॥
पात्र पाहूनि दान करणें ॥ कीं रोगी पाहूनि औषध देणें ॥ सभा पाहूनि कीर्तन करणें ॥ तरी तार्किकज्ञान असावें ॥८८॥
असो मागील अनुसंधान ॥ उगाचि राहतां जगज्जीवन ॥ राही रुक्मिणी बोलावून ॥ देत गार्‍हाणें त्यांपासीं ॥८९॥
सत्यभामा कालिंदी सती ॥ जवळ बोलावून निजप्रीतीं ॥ गोणाई म्हणे तयांप्रती ॥माझी वचनोक्ति ऐकावी ॥१९०॥
दीनदयाळ तुमचा पती ॥ श्रुतिशास्त्रें ज्यासी वर्णिती ॥ तरी माझिया मुलास लावून प्रीती ॥ विदेहस्थिती केली ॥९१॥
माझा एकुलता एक बाळ ॥ भजनीं लावियेला सर्वकाळ ॥ ऐसा नाटकी हा घननीळ ॥ तुम्ही सकळां जाणतसां ॥९२॥
शुक्र सनकादिक थोर ॥ साधु संत योगेश्वर ॥ यांसी ठाउका विचार ॥ आमुचा घरचार मोडला ॥९३॥
आम्ही दुर्बळ अनाथ दीन ॥ घरीं नाहें वस्त्र अन्न ॥ नाम्यासी लाविलें आपुलें ध्यान ॥ तुम्हांकारणें कळों द्या ॥९४॥
देव देखिले ऐकिले फार ॥ चौरस भोजनीं समजणार ॥ परी याऐसा अगोचर ॥ कोणी साचार न देखों ॥९५॥
कुळदेव म्हणवितो आपणिया ॥ तरी नित्य पडों याचे पायां ॥ उगेंच मैदावें करूनियां ॥ छळितो वायां आम्हांसी ॥९६॥
भीड धरिली म्यां आजवरी ॥ म्हणोनि राहिली याची थोरी ॥ मर्यादा तुटलियावरी ॥ चौघाचारीं नेईन मी ॥९७॥
दर्शन होतांचि तये क्षणीं ॥ जीवित्वाची करितो हानी ॥ एक पुत्र तो लाविला ध्यानीं ॥ काय साजणी करावें ॥९८॥
वृत्तांत ऐकिला कीं सकळ ॥ आतां प्रार्थूनि घननीळ ॥ तयासी सांगोनि तत्काळ ॥ माझी तळमळ निरसावी ॥९९॥
तुम्हीं अवघ्या मिळोनि कामिनी ॥ घरासी आणावा चक्रपाणी ॥ काय आहे त्याचें मनीं ॥ ऐसें साजणी पुसावें ॥२००॥
पुढती बोले नामयासी ॥ कां गा येथें बैसलासी ॥ आतां बळेंच नेईन तुजसी ॥ हृषीकेशीदेखतां ॥१॥
नाम्या चोर तूं संसारीं ॥ जगन्मोह हा असे वैरी ॥ उभा ठाकोनि विटेवरी ॥ प्रपंच बोहरी करीतसे ॥२॥
अरे या नाटक्या जगदुद्धारा ॥ पुंडलिकानें दिधला थारा ॥ म्हणवोनि नयेसी तूं मंदिरा ॥ प्रपंच मातेरा केला कीं ॥३॥
तरी आतां तुज नेल्याविण ॥ कदा न जाय मी येथून ॥ ऐसा धरिला अभिमान ॥ पंढरी गिळीन अवघी हे ॥४॥
अगा ये रूपलावण्या ॥ प्रत्युत्तर दे शाहाण्या ॥ उगाच बैससी यादवराण्या ॥ हे घरघेण्या विठ्ठला ॥५॥
गोणाई म्हणे जगज्जीवना ॥ विश्वव्यापका भक्तभूषणा ॥ माझी गोष्ट तुझिया मना ॥ करुणाघना नये कीं ॥६॥
नामा देऊनि माझे हातीं ॥ जगीं वाढवीं निजकीर्ती ॥ ऐसें ऐकोनि श्रीपती ॥ काय वचनोक्त बोलत ॥७॥
म्हणे ऐक गोणाबाई ॥ आपुले पुत्रासी घेऊन जाईं ॥ आम्हांवरी निमित्त पाहीं ॥ व्यर्थ कासया ठेविसी ॥८॥
हातीं धरून नामयासी ॥ विठ्ठल म्हणती गोणाईसी ॥ घेऊनि जाईं निजपुत्रासी ॥ निजमंदिरासी ये वेळे ॥९॥
याणें टाकिली ममता माया ॥ मजवरी वेहरण आलें वायां ॥ घेऊनि जाईं आपुले ठाया ॥ व्यर्थ कासया बोलसी ॥२१०॥
ऐसें म्हणोनि श्रीपती ॥ नामा आणोनि दिधला हातीं ॥ गोणाबाई सत्वरगती ॥ सदनाप्रति चालिली ॥११॥
मार्गीं चालतां निजमाया ॥ काय बोलतसे नामया ॥ शरण गेलासी पंढरीराया ॥ प्रपंचमाया टाकुनी ॥१२॥
ऐकोनि गोणाईची मात ॥ नामा उगाचि खाली पाहात ॥ नेत्रांतूनि अश्रु पडत ॥ प्रेमयुक्त तेधवां ॥१३॥
नामयासी हातीं धरूनी ॥ घरा त्वरित आली जननी ॥ तों राजाबाई निजसदनीं ॥ स्वयंपाकासी निघाली ॥१४॥
नानापरींचीं दिव्यान्नें ॥ नवविध रचिलीं पक्वानें ॥ म्हणे चोज केलें जगज्जीवनें ॥ हरुषें पूर्ण ओसंडे ॥१५॥
हांडे भांडीं द्रव्यराशी ॥ वस्त्राभरणें पाहूनि निजकांतेसी ॥ अनुताप जाहला चित्तासी ॥ नामयासी तेधवां ॥१६॥
जैसा मृग पडलिया फांसीं ॥ घाबरा होय निजमानसीं ॥ द्रव्य देखोनि नामयासी ॥ गति तैसी जाहली ॥१७॥
कीं दीपकासी लागतां प्रभंजन ॥ तेचि क्षणीं दिसे तेजहीन ॥ तेवीं नाम्याचें उद्विग्न मन ॥ वैभव देखोन जाहलें ॥१८॥
कीं सुंदरासी होतां कुष्ठ प्राप्त ॥ देखोनि कंटाळे त्याचें चित्त ॥ तेवीं वैभव देखोनि वैष्णवभक्त ॥ कंटाळत निजमानसीं ॥१९॥
कीं ग्रहण लागतां वासरमणी ॥ तेजहीन दिसे तये क्षणीं ॥ तेवीं मायावैभव देखोनी ॥ म्लानवदन जाहला ॥२२०॥
कीं मेघांसी लागतां दक्षिणवारा ॥ ते विरूनि जाती दिगंतरा ॥ तेवीं नामयाचे हृदयांतरा ॥ विक्षेप त्वरा पावला ॥२१॥
कीं पराजय ऐकोनि नृपनाथ ॥ विक्षेपें भरे तयाचें चित्त ॥ तेवीं वैभव देखोनि विष्णुभक्त ॥ चिंताक्रांत जाहला ॥२२॥
कीं श्रीशुक बैसला अनुष्ठानीं ॥ रंभा देखोनि कंटाळला मनीं ॥ तेवीं नामा संपत्ति देखोनी ॥ उद्विग्न मनीं जाहला ॥२३॥
मातेसी पुसे निजप्रीतीं ॥ कोठोनि आली धनसंपत्ती ॥ गोणाई म्हणे मजप्रती ॥ नाहीं निश्चिती ठाउकें ॥२४॥
कांता म्हणे नामयासी ॥ उशीर जाहला भोजनासी ॥ तरी स्नान करूनि वेगेंसी ॥ प्रसादासी बैसावें ॥२५॥
नामा विस्मित जाहला मनें ॥ आज कां नम्र बोलिली वचनें ॥ म्हणे धनधान्य घरीं देखोन ॥ समाधान निजकांते ॥२६॥
द्रव्य नसतां आपुले पदरीं ॥ बंधु म्हणती आमुचा वैरी ॥ पिशुन हांसती दुराचारी ॥ ऐसी परी मायेची ॥२७॥
निजोडा पुत्र देखोनि नयनीं ॥ पिता कंटाळे तये क्षणीं ॥ म्हणे आमुचे पोटीं येऊनी ॥ अपकीर्ति जनीं तुवां केली ॥२८॥
शेजारी लोक होती कष्टी ॥ म्हणती उगाचि पडातो आमुचे दृष्टी ॥ कन्याभगिनींच्या जातां भेटी ॥ लज्जित पोटीं त्या होती ॥२९॥
दुर्बळ भ्रतार असतां जाण ॥ कांता नेदीचि आलिंगन ॥ पुत्र म्हणती आम्हांकारण ॥ करूनि ऋण ठेविलें ॥२३०॥
एवं अवघे सुखाचे सांगाती ॥ विषमकाळीं अव्हेरिती ॥ दीनबंधु रुक्मिणीपती ॥ नामयासी प्रीति तयाची ॥३१॥
कांतेसी पुसे तये क्षणीं ॥ कोठूनि आणिली द्रव्यगोणी ॥ येरी नबोले तये क्षणीं ॥ मौन धरूनि राहिली ॥३२॥
म्हणे यासी सांगतां ये अवसरीं ॥ आतांचि वांटील वरिचेवरी ॥ ऐसें जाणूनि निर्धारी ॥ प्रत्युत्तर न बोले ॥३३॥
तंव जनी नामयाची दासी ॥ जवळी येऊनि वेगेंसीं ॥ चरणीं लागूनि नामयासी ॥ सांगे तयासी वृत्तांत ॥३४॥
म्हणे राजाबाई होतां कष्टी ॥ सत्वर पावले जगजेठी ॥ वाणी होऊनि केशवशेटी ॥ गोणी लोटी द्रव्याची ॥३५॥
होऊनि कानडा लिंगाईत ॥ आला होता वैकुंठनाथ ॥ अंगणीं ठाकूनि बोलिला मात ॥ पाहुणा त्वरित आलों कीं ॥३६॥
राजाई पुसे त्यालागून ॥ तुमचें सांगा नामाभिधानं ॥ ऐसें करुणाघन ॥ काय वचन बोलिला ॥३७॥
मधुरोत्तरीं राजीवनेत्र ॥ म्हणे नामा आमुचा परम मित्र ॥ नाम पुससी स्वतंत्र ॥ घनश्यामगात्र मज म्हणती ॥३८॥
अन्न वस्त्र संकीर्ण येथ ॥ ऐसी ऐकोनि