रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018 (15:56 IST)

'फोर्ब्ज इंडिया 30 अंडर 30' मध्ये मिथिला पालकर, भूमी पेडणेकर

जगप्रसिद्ध फोर्ब्ज मासिकाने 'फोर्ब्ज इंडिया 30 अंडर 30' म्हणजे तीस वर्षांखालील 30 भारतीयांची यादी जाहीर केली आहे. क्रीडा, मनोरंजन, संगीत, उद्योग अशा विविध क्षेत्रातील तरुणांचा यात समावेश आहे. यात क्रिकेटपटू जसप्रीत बुमरा, अभिनेत्री मिथिला पालकर, भूमी पेडणेकर यांना या यादीत स्थान मिळालं आहे.

पिस्तुल शूटर हीना सिद्धू, जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमरा, हॉकी गोलकीपर सविता पुनिया, महिला क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू हरमनप्रीत कौर या क्रीडापटूंचा फोर्ब्जच्या यादीत समावेश आहे. कप साँगमुळे घराघरात पोहचलेली 'गर्ल इन द सिटी' आणि 'मुरांबा' फेम मराठमोळी अभिनेत्री मिथिला पालकर, 'दम लगा के हैशा' आणि 'शुभमंगल सावधान' फेम अभिनेत्री भूमी पेडणेकर, 'मसान' फेम अभिनेता विकी कौशल हे मनोरंजन विश्वातले तारे आहेत. 'ओके जानू'तील हम्मा साँग फेम गायक जुबिन नौतियालही यादीत झळकला आहे.