मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 10 जून 2020 (12:34 IST)

पाकिस्तानमध्ये जुगार खेळल्याच्या आरोपाखाली चक्क गाढवाला अटक

पाकिस्तानी पोलिसांची सोशल मीडियावर जबदस्त चर्चा सुरु आहे. पाकिस्तानमधून अनेकदा विचित्र घटना समोर येत असतात. अशीच एक घटना समोर आली असून येथे जुगार खेळल्याच्या आरोपावरून थेट एका गाढवालाच अटक करण्यात आली आहे.
 
पाकिस्‍तानच्या पंजाब प्रांतातील रहीम यार खान या भागात शनिवारी पोलिसांनी या गाढवाला अटक केली. याशिवाय आठ लोकांनाही अटक करण्यात आली आहे. या गाढवाचे नावही एफआयआरमध्ये टाकाण्यात आले आहे.
 
आरोपी गाढवाला पोलिस ठाण्याबाहेर बांधण्यात आले आहे. तसेच पोलिसांनी घटनास्थळावरुन जवळपास एक लाख 20 हजार रुपयेही जप्त केले. हे जुगारी गाढवाच्या शर्यतीसाठी पैसे लावत होते. 
 
पोलिसांची ही कारवाई केवळ संबंधित भागाताच नव्हे तर संपूर्ण सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाली आहे. पत्रकार नायला इनायत यांनी ट्विटरवर आरोपी आणि गाढवाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यासोबत पाकिस्तानी वृत्त वाहिनीची एक लिंकही शेअर केली आहे.
 
गाढवाला अटक केल्याची बातमी समोर आल्यापासून सोशल मीडियावर पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या पोलिसांना ट्रोल केलं जात असून या कारवाईची थट्टा केली जात आहे.