शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

विश्वातील सर्वात सुंदर महिला पोलिस ऑफिसर फोटो शेअर करून चर्चेत, परंतू...

जर्मनीची महिला पोलिस अधिकारीला हे लक्षातच आले नाही की सोशल मीडियावर स्वत:चे फोटो शेअर करणे तिला इतकं महागात पडेल. खरं तर या महिलेला विश्वातील सर्वात सुंदर पोलिस अधिकारी मानले जात आहे. आता पर्यंत आपल्या फोटोंमुळे प्रशंसा करवत असलेली ही महिला अधिकारी आता समस्याला सामोरा जात आहे कारण तिला चेतावणी मिळाली आहे. तिच्या विभागाने तिला आपले फोटो शेअर करण्यास मनाही केली आहे कारण तिच्या फोटोंमुळे लोकांना गुन्हा करण्याची प्रेरणा मिळत आहे असे विभागाचे म्हणणे आहे.
 
एड्रियन कोलेसजर नावाची ही जर्मन पोलिस अधिकारी फिटनेसची शौकीन आहे. आपल्या शिफ्टनंतर फीट आणि सुंदर राहण्यासाठी ती आठवड्यातून पाच दिवस जिममध्ये खूप व्यायाम करते. एड्रियनला स्वत:च्या फिगरवर गर्व असून फीट राहिल्याने तिच्या कामात मदत होते.
एड्रियन कोलेसजरला आपली फोटो सोशल मीडियावर अपलोड करणे पसंत आहे तिचे इंस्टाग्रामवर सुमारे 95,000 फॉलोअर्स आहे. 2015 मध्ये ती बॉडी बिल्डिंग डब्ल्यूएमच्या बिकिनी क्लासची सहभागी राहून चुकली आहे.
 
विभागाप्रमाणे सोशल मीडियावर एड्रियनचे सुंदर फोटो बघून तिच्या हाती अटक व्हावी म्हणून गुन्हा करणार्‍यांचे प्रमाण वाढत आहेत. म्हणून विभागाने तिला सोशल मीडियावर फोटो शेअर करू नये अशी चेतावणी दिली आहे. पोलिस विभागाने नोटीस बजावले आहे की तिने पोलिस अधिकारी म्हणून काम करावे किंवा मॉडल म्हणून सोशल मीडियावर फोटो शेअर करावे, दोन्ही काम सोबत करण्याची परवानगी नाही.
(Photo courtesy : adrienne koleszar Instagram Account)