शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

जगी सर्व सुखी हा माणूस आहे !

जगी सर्व सुखी असा कोण आहे? असा प्रश्न आम्ही विचारत असतो परंतू आता याचे उत्तर मिळाले आहे. असा एक सुखी, आनंदी माणूस याच पृथ्वीतलावर आणि आपल्याच भारतात आहे.
 
मूळचा फ्रेंच ना‍गरिक असलेल्या या माणसाला भारतातच सुखी राहण्याचा मूलमंत्र मिळाला आणि गेल्या चाळीस वर्षांपासून अधिक काळ तो दु:खरहित स्थितीत राहिला आहे. तो सर्वात आनंदी असल्याचे विज्ञानानेही सिद्ध केले असून त्याला संयुक्त राष्ट्रसंघानेही त्यासाठी सन्मानित केले आहे.
 
मॅथ्यू रिकार्ड असे त्यांचे नाव. 70 वर्षीय मॅथ्यू म्हणाले की आधी त्यांनाही इतरांप्रमाणे छोट्या छोट्या बाबींचे टेन्शन यायचे. 1972 च्या सुमारास जेव्हा ते दार्जिलिंगमध्ये आले त्यावेळी त्यांना त्यांचे शिक्षक कांगयूर यांनी दैनंदिन जीवनात आनंदी राहण्याचा मंत्र दिला. हळूहळू ती त्यांची सवय बनली. हाच माझ्या जीवनातील यू टर्न ठरला. त्यानंतर मी फ्रान्स सोडून दार्जिलिंग- नेपाळमध्ये राहण्याचा निर्णय घेतला.