शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 6 जून 2020 (15:00 IST)

आता बारगर्ल्स नाही तर रोबोट बनविणार तुमचं डिंक्र

कोरोना व्हायरसच्या थैमानमुळे अनेक गोष्टी बदलत आहे ज्यात एक मोठा बदल होणार आहे बार कल्चरमध्ये. लॉकडाऊनमुळे अनेक दिवस घरात बंद राहिल्यानंतर आता हळू-हळू जीवन पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. अनेक सुट देखील दिल्या जात आहे. अशात दक्षिण कोरियामध्ये देखील कोरोनावर मात करुन देश पुन्हा सुरु करण्याचा प्रयत्न सुरु आहेत. 
 
व्यवहार सुरु होत असले तरी अनेक बदल बघण्यात येत आहे. आता येथे बारमध्ये बारगर्ल्सचं आकर्षक नसणार कारण आता बारमध्ये गेल्यानंतर रोबोट ग्राहकांची सेवा करणार आहे. 
 
सर्व दुकानं, रेस्टांरंट, बार सुरु केले जात असले तरी सोशल डिस्टन्सिंग हा सर्वात महत्त्वाचा उपाय सांगितला जातोय. यामुळेच आता बारमध्ये मालकांनी मुलींना रजा देत रोबोटची नियुक्ती केलीय.
 
हे रोबोट्स मद्य सर्व्ह करणे, कॉकटेल तयार करणे आणि इतर कामांमध्ये देखील मदत करणार आहे. बार व्यतिरिक्त हॉस्पिटल्स, दुकाने, आणि इतर ठिकाणी रोबोट्सच 
 
अधिकाधिक उपयोग होण्याचे संकते दिले जात आहे. मात्र त्यामुळे रोजगार कमी होणार असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.