गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 11 सप्टेंबर 2019 (10:22 IST)

बाप्परे, क्रेडिट कार्डचे बिल भरण्यासाठी जुळ्या मुलांना विकले

चीनच्या झेजिआंगमधील सिक्सीमध्ये एका महिलेने क्रेडिट कार्डचे बिल भरण्यासाठी चक्क स्वत:च्या दोन जुळ्या मुलांना विकले आहे. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, अवघ्या दोन आठवड्यांपूर्वी चीनमध्ये राहणाऱ्या एका 20 वर्षीय तरुणीने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. तिला महागडे मोबाईल, कपडे यासंह इतर गोष्टींचा शौक होता. तिचे क्रेडिट कार्डचे बिल 6 लाख 56 हजार रुपये झाले होते. हे बिल भरण्यासाठी तिच्याकडे पैसे नसल्याने तिने तिच्या दोन्ही मुलांना विकण्याचा निर्णय घेतला.
 
त्यानुसार तिने दोन्ही मुलांना वेगवेगळ्या कुटुंबाला विकले. मुलं खरेदी करणारी दोन्ही कुटुंब तिच्या घरापासून 700 किमी लांब राहतात. त्या मुलांना विकल्यानंतर महिलेला एका कुटुंबाकडून 4.5 लाख, तर दुसऱ्या कुटुंबाकडून 2 लाख रुपये मिळाले. मुलांना विकलेल्यानंतर मिळालेल्या पैशातून तिने नवीन फोन खरेदी केला. तसेच क्रेडिट कार्डचे बिलही  भरले.