बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2021
Written By
Last Modified: शनिवार, 10 एप्रिल 2021 (13:26 IST)

CSK vs DC IPL 2021 : चेन्नई विरुद्ध दिल्ली दरम्यानचा दुसरा सामना

गुरू-शिष्याच्या लढतीत आज कोण ठरणार वरचढ?  
मुंबई, दि. 9- ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स व महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामध्ये आज (शनिवारी) आयपीएलधील दोन्ही संघांची पहिली लढत होणार आहे. ज्या वेळी हे दोन्ही संघ आमने-सामने येतील, त्यावेळी गुरू-शिषच्या लढतीत कोण बाजी मारणार व कोण वरचढ ठरणार याकडे क्रिकेट शौकिनांचे लक्ष असेल.
 
दिल्लीच्या संघाने यूएईमध्ये खेळल्या गेलेल्या मागील सत्रात उपविजेतेपद प्राप्त केले आहे. यंदाच्या वर्षी जेतेपदाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी यांचे लक्ष्य विजयी अभियनाने स्पर्धेस सुरूवात करण्याचे असेल. तीन वेळचा चॅम्पियन असलेला चेन्नई सुपर किंग्जचा संघ मागील वर्षी सातव्या स्थानावर राहिला होता. ती खराब कामगिरी विसरून आयपीएलमधील तगडा मानला जात असलेला चेन्नईचा संघ यंदाच्या हंगामात विजयाने सुरूवात करण्यास उत्सुक असेल.
 
दुखापतग्रस्त श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत कर्णधारपद सांभाळणार्या यष्टिरक्षक फलंदाज पंतने नुकतेच म्हटले होते की, तो धोनीकडून आतापर्यंत मिळालेल्या सर्व मार्गदर्शनाचा उपयोग या पहिल्या सामन्यात करेल. कर्णधार म्हणून माझा पहिला सामना माहीभाई यांच्याविरोधात आहे. नूतन कर्णधार पंतच्या दिल्लीची दिग्गज धोनीच्या चेन्नईशी टक्कर माझ्यासाठी हा चांगला अनुभव असेल, कारण मी त्यांच्याकडून  बरेच काही शिकलो आहे. मी माझा अनुभव व त्यांच्याकडून मिळालेल्या मार्गदर्शनाचा पुरेपूर वापर करेन.
सामन्याची वेळ :
संध्याकाळी 7.30 वाजता.