बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: रविवार, 11 नोव्हेंबर 2018 (00:10 IST)

चांगली बातमी - आता फेसबुक मेसेंजरवरून देखील चुकून पाठविलेला संदेश हटवता येईल

व्हाट्सएपनंतर आपण लवकरच फेसबुकवर पाठवलेले संदेश देखील हटवू शकाल. फेसबुक लवकरच मेसेंजर अॅपवर 'अनसेंड' बटण वैशिष्ट्यीकृत करणार आहे. माहितीनुसार आपण एखादा संदेश हटवू इच्छित असल्यास, तर संदेश पाठविण्याच्या 10 मिनिटांच्या आत हे बटण दाबावे, मग संदेश दुसर्‍या वापरकर्त्यापर्यंत पोहोचणार नाही. हे 'अनसेंड' बटण सर्वात प्रथम जेन वोंगने जगासमोर आणले होते. त्याने ट्विटरवर त्याचे फोटो देखील शेअर केले होते.
 
फेसबुकच्या रिलीज नोटमध्ये लिहिले होते, या नवीन अपडेटमुळे iOS यूजर्स आपले कोणतेही
संदेश 10 मिनिटांत हटविण्यात सक्षम असतील. आता जर एखादी व्यक्ती चुकून संदेश, फोटो किंवा कोणतीही माहिती एखाद्या चुकीच्या चॅटमध्ये पाठवतो तर तो संदेश आता ते 10 मिनिटांचा आधी हटवू शकतो.