गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

जिओ गीगाफायबरसाठी किमान 3 महिने करावी लागेल प्रतीक्षा

रिलायन्स जिओ गीगाफायबरसाठी रजिस्ट्रेशन केले असतील तरी किमान तीन महिने प्रतीक्षा करवी लागेल. कंपनी सूत्रांप्रमाणे प्रत्येक रजिस्ट्रेशनावर कनेक्शन देण्यासाठी तारीख निश्चित केलेली नाही. सध्या कंपनी रजिस्टर्ड ग्राहकांचे सर्व्हे करत आहे की खरंच ते गीगाफायबर सेवा घेण्यास इच्छुक आहे की नाही. कंपनी एकाच पॅकेजमध्ये टीव्ही कनेक्शन, ब्रॉडबँड आणि लँडलाइन फोन सुविधा देईल.
 
सध्या रिलायन्स जिओ स्वत:च्या समूह, सोसायटी, आरडब्लूए इतर ठिकाणी कनेक्शनसाठी रजिस्ट्रेशन करत आहे. याने लोकांची या सर्व्हिसप्रती कितपत इच्छुक आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.  
 
रजिस्ट्रेशन करवणार्‍या प्रत्येक व्यक्तीला कनेक्शन मिळेलच असे निश्चित समजले जात नाहीये कारण कंपनीप्रमाणे रजिस्ट्रेशन केवळ एक सर्व्हे असू शकतो.  तरी कनेक्शन मिळाल्यावर ग्राहकांना फोनच्या वायरनेच 600 एचडी चॅनल्स बघायला मिळतील. रिलायन्सचा सेट बॉक्स जोडून हे चॅनल्स बघता येतील.
 
कंपनी ने ग्राहकांसाठी 5 प्लान लाँच केले आहे. 500 ते 1500 पर्यंतचा मासिक प्लान असतील. सर्व प्लानमध्ये डीटीएच कनेक्शन साठी जास्त पैसे आकारावे लागणार नाही. होय पण प्लानप्रमाणे चॅनल्स कमी जास्त असू शकतात.
 
गीगा टीव्ही लावण्यासाठी ग्राहकांना आकारावे लागणारे पैसे कनेक्शन कापल्यास परत मिळतील. राउटर आणि सेट टॉप बॉक्ससाठी सिक्योरिटी म्हणून 4500 रुपये खर्च करावे लागतील. तसेच प्रत्येक नवीन कनेक्शनवर ग्राहकांना तीन महिन्यापर्यंत सर्व सुविधा कंपनी तर्फे देण्यात येईल. 90 दिवसांसाठी 100 एमबीपीएस स्पीड मिळेल ज्यात प्रत्येक महिन्यात 100 जीबी डेटा खर्च करू शकाल.