गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शनिवार, 28 जुलै 2018 (16:06 IST)

आता फेसबुकची युट्युब सोबत स्पर्धा, वॉच पार्टी फिचर

फेसबुकने आपल्या युजर्ससाठी एक नवं फिचर आणल असून 'वॉच पार्टी' नाव आहे. या नवीन फिचरमध्ये सोशल नेटवर्कींग साईट सर्फिग करताना व्हिडिओ पाहणं आणि कमेंट करण्याचीही सोय दिली आहे. साधारण सहा महिन्याच्या परीक्षणानंतर फेसबुकने हे फिचर बाजारात लॉन्च केल आहे. या नवीन फिचर नुसार फेसबुक व्हिडिओ स्ट्रिमिंग स्पेसमध्ये युट्यूबशी स्पर्धा सुरु केली आहे.
 
वॉच व्हिडिओ पार्टी सुरू केल्यानंतर युजर्स लाईव्ह किंवा रेकॉर्ड व्हिडिओ पाहू शकणार आहेत. यासोबतच एकमेकांशी गप्पाही मारता येणार आहे.
 
युजर्सला फेसबुकवर एक व्हिडिओ शोधुन त्यावर इतरांना आमंत्रित कराव लागेल. त्यानंतर चॅट विंडो उघडेल आणि व्हिडिओ सुरू असतानाच आपआपसात चर्चा करु शकणार आहेत. जगभरातील युजर्ससाठी हे फिचर खुले करण्यात आले आहे. होस्टिंगमुळे 'वॉच पार्टी' चा यजमान इतरांना व्हिडिओशी जोडून 'वॉच पार्टी' सुरू ठेवू शकतो. यामध्ये आऊटसोर्सिंग फिचरही जोडलंय.