गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 27 मे 2019 (17:32 IST)

ठाकरे घराण्यातील ही व्यक्ति होऊ शकते उपमुख्यमंत्री

लोकसभा निकालानंतर देशासह राज्यभरात राजकीय पक्षांच्या रणनीती आखण्यासाठी बैठकांचं सत्र असून, राज्यात मुख्य पक्ष असलेया शिवसेनेच्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. सोबतच सक्रीय राजकारणात काम करणारे बाळासाहेब ठाकरे यांचे नातू युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही त्यांच्या युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. आज युवासेनेची शिवसेना भवनात बैठक होत आहे. यामध्ये पुढे चिऊ घातलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी ही बैठक असणार आहे. मात्र आता ठाकरे घराण्यातील व्यक्ती स्वतः निवणूक लढवणार का यावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या बैठकीत आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढवण्याबाबतची घोषणा करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सोबतच आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढावी या करिता शिवसेना पक्षासह, भाजपातील केंद्रीय पक्षश्रेठी आग्रही आहेत. 
 
आज सायंकाळी 5 वाजता शिवसेना नेत्यांची बैठक होणार आहे. उद्धव ठाकरे यांनी ही बैठक बोलावली असून,‘मातोश्री’वर ही बैठक होणार आहे. या बैठकीत राज्य मंत्रिमंडळ विस्तार, उपमुख्यमंत्री पदावर चर्चा होण्याची दाट शक्यता असून, शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद वाट्याला आले तर आदित्य ठाकरे यांचं नाव त्या पदासाठी शिवसेनेकडून देण्यात येईल अशी चर्चा आहे. अश्यापरिस्थितीत व पदाधिकारी, जेष्ठ नेत्यांच्या मागणी नुसार आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे जर आदित्य यांनी निवडणुकीचा विचार जर केला तर ठाकरे घराण्यातील पहिल्या व्यक्ती ठरतील की ज्या एखाद्या पदावर विराजमान होणार आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही निवडणूक लढवली नाही सोबतच त्यांनी कधीही कोणत्याही पदाचा मोह देखील धरला नाही.