बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 13 मार्च 2019 (10:00 IST)

असे आहे युतीच्या प्रचाराचे नियोजन

युतीची रणनिती ठरवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात उशिरा मध्यरात्री पर्यंत मातोश्रीत चर्चा केली आहे. युतीच्या उमेदवारांचा प्रचार एकदिलाने करण्यासाठी शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी प्रचाराच्या सुरुवातीलाच युतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे एकत्र मेळावे आयोजित केले आहेत. येत्या १५, १७ आणि १८ मार्च रोजी हे मेळावे महाराष्ट्रात सहा वेगवेगळ्या जिल्ह्यांत होणार आहे. तसेच पदाधिकाऱ्यांच्या या मेळाव्यांनंतर महाराष्ट्रातील युतीचा सर्वात मोठा महामेळावा आयोजित केला जाणार आहे. त्याची घोषणाही येत्या दोन दिवसांत होणार असल्याची माहिती मिळते आहे. 
 
या बैठकीत ठरलेल्या रणनितीप्रमाणे भाजपा व शिवसेना पदाधिकाऱ्यांचा पहिला मेळावा येत्या शुक्रवारी दि १५ मार्च रोजी दुपारी अमरावतीला होणार असून दुसरा पदाधिकारी मेळावा १५ मार्चला रात्री नागपूरला होणार आहे. युतीचा तिसरा मेळावा येत्या रविवारी म्हणजेच १७ मार्चला दुपारी औरंगाबादला होणार असून याच दिवशी युतीचा चौथा मेळावा रात्री नाशिकला होणार आहे. युतीचा पाचवा मेळावा सोमवारी म्हणजेच १८ मार्चला दुपारी नवी मुंबईत होणार असून याच दिवशी युतीचा सहावा मेळावा रात्री पुण्यात होणार असल्याचे या बैठकीत ठरले.