रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 11 एप्रिल 2019 (09:33 IST)

लोकसभा निवडणुकीचे पहिल्या टप्प्यातील मतदान : सकाळ सत्रातील अपडेट

लोकसभा निवडणूक 2019 साठी देशात आज पहिल्या टप्प्यातील मतदान सुरु झाले आहे. यामध्ये देशातील 20 राज्यांतील 91 जागांवर, चार राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. आजच्या मतदानात अनेक राजकीय दिग्गजांचं भवितव्य यंत्रबंद होणार आहे.
 
राज्यात विदर्भातील उपराजधानी नागपूर, रामटेक, गोंदिया-भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ-वाशीम, गडचिरोली-चिमूर या सात मतदारसंघांमध्ये मतदान सुरु झाले आहे. नितीन गडकरी, हंसराज अहीर या केंद्रीय मंत्र्यांसह काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, नाना पटोले, किशोर गजभिये यांसारख्या अनेक बड्या नेत्यांचं भवितव्य पणाला लागलं आहे.
 
तर देशातील पहिल्या टप्प्यात आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मेघालय, उत्तराखंड, मिझोरम, नागालँड, सिक्किम आणि तेलंगणातील सर्व लोकसभा मतदारसंघातील जागांवर मतदान होत आहे. याव्यतिरिक्त उत्तर प्रदेशच्या आठ जागा, बिहारच्या चार जागा तर आसाम आणि महाराष्ट्रातील सात जागा, ओडिशातील चार जागा आणि पश्चिम बंगालच्या दोन जागांवर मतदान प्रक्रिया पार पडत आहे.
 
यवतमाळ : येथील दाते कॉलेज मतदान केंद्रावर EVM पाऊण तास विलंबाने सुरू, तांत्रिक बिघाड, मतदार रांगेत ताटकळत होते 
नागपूर - सर्वांनी मतदान करायला हवं, राष्ट्राची सुरक्षा आणि एकात्मतेसाठी मतदान करायला हवं. निवडणूक आयोगही म्हणतं, आम्हीही तेच म्हणत असल्याचं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. स्वर्गीय भाऊजी दफ्तर उच्च प्राथमिक शाळेच्या संघ बिल्डिंगमागील मतदान केंद्रात भागवत यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला  
मतदानाला सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. मतदानासाठी नागरिकांचा मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत आहे. 
नक्षल्यांच्या धमकीला भीक न घालता गडचिरोलीतही शांततेत मतदानाला सुरूवात झालीय. अनेक मतदारांनी सकाळी सकाळीच मतदानकेंद्राकडे धाव घेतली, नक्षलप्रभावित भागात सकाळी ७ ते ३ पर्यंत मतदानाची वेळ देण्यात आली आहे 
नागपुरात सकाळापासून मतदानाला गर्दी, दुपारच्या उन्हाचा विचार करता सकाळीच मतदान करण्याकडे कल
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात मतदानाला सुरुवात, पहिला मतदार विजय बुक्कावार यांनी मताचा हक्क बजावला 
रामटेकमध्ये मतदानाला सुरुवात, मतदान केंद्रांवर चोख पोलिस बंदोबस्त 
सर्व मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावा, मोठ्या संख्येने मतदान करा – पंतप्रधान नरेंद्र मोदी 
पहिल्या टप्प्यातील सुमारे 1400 मतदान केंद्रांचे लाईव्ह वेबकास्ट 
वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ-वाशिम या सात मतदार संघामध्ये मतदान 
44 हजार ईव्हीएम यंत्र (बॅलेट युनिट आणि सेंट्रल युनिट) आणि 20 हजार व्हीव्हीपॅट यंत्र देण्यात आले आहेत. सुमारे 73 हजार 837 कर्मचारी मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आले 
चिमूर, गोंदिया या लोकसभा मतदार संघातील दुर्गम भागात असणाऱ्या आमगाव, आरमोरी, गडचिरोली, अहेरी आणि अर्जुनी मोरगाव या विधानसभा मतदार संघात मतदानाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 3 अशी
वर्धा- 2026 मतदान केंद्र (एकूण मतदार 17 लाख 41 हजार).
रामटेक – 2364 मतदान केंद्र (एकूण मतदार 19 लाख 21 हजार)
नागपूर – 2065 मतदान केंद्र, (एकूण मतदार 21 लाख 60 हजार),
भंडार-गोंदिया – 2184 मतदान केंद्र (एकूण मतदार 18 लाख 8 हजार)
गडचिरोली-चिमूर – 1881 मतदान केंद्र (एकूण मतदार 15 लाख 80 हजार)
चंद्रपूर – 2193 मतदान केंद्र (एकूण मतदार 19 लाख 8 हजार)
यवतमाळ-वाशिम – 2206 मतदान केंद्र (एकूण मतदार 19 लाख 14 हजार)