1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 26 मार्च 2019 (16:44 IST)

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांची ही आहे मालमत्ता

भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष व महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी स्थापन करणारे  अॅड. प्रकाश आंबेडकर हे लोकसभा निवडणक लढवत आहेत. त्यांची बहुजन आघाडी  महाराष्ट्रातील 48 च्या 48 जागांवर  उमेदवार दिले आहेत. त्यापैकी अकोला व सोलापूर या दोन जागांवरुन स्वत: अॅड. प्रकाश आंबेडकर निवडणूक लढत आहेत. त्यांनी  उमेदवारी अर्ज दाखल  केला असून निवडणूक आयोगाकडे  प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. यामध्ये  त्यांनी त्यांचे उत्पन्न, मालमत्ता, कर्ज, शिक्षण, त्यांच्यावर दाखल गुन्हे इत्यादी सविस्तर माहिती  सादर केली आहे.

प्रकाश आंबेडकर हे दहावीची परीक्षा 1972 साली पास झाले असून,  सिद्धार्थ कॉलेजमधून 1978 साली त्यांनी बीएचं शिक्षण करत 1981 साली वकिलीची अर्थात  एलएलबीची पदवी मिळवली आहे. प्रकाश यशवंत आंबेडकर यांचं उत्पन्न पुढील प्रमाणे आहे.

साल 2014-15 : 1 लाख 61 हजार 100 रुपये, साल 2015-16 : 3 लाख 8 हजार 580 रुपये, साल 2016-17 : 2 लाख 61 हजार 650 रुपये, साल 2017-18 : 4 लाख 15 हजार 525 रुपये तर  2018-19 : 8 लाख 60 हजार 190 रुपये उत्पन्न आहे. अंजली आंबेडकर यांचे उत्पन्न 2014-15 : 12 लाख 95 हजार 60 रुपये, 2015-16 : 26 लाख 24 हजार रुपये, 2016-17 : 23 लाख 7 हजार 840 रुपये ,2017-18 : 20 लाख 5 हजार 530 रुपये ,2018-19 : 21 लाख 9 हजार 140 रुपये उत्पन्न आहे. यांची जंगम मालमत्ता प्रकाश आंबेडकर – 41 लाख 81 हजार 189 रुपये, अंजली आंबेडकर (पत्नी) – 73 लाख 86 हजार 273 रुपये, सुजात आंबेडकर (मुलगा) – 9 लाख 55 हजार 454 रुपये ,स्थावर मालमत्ता प्रकाश आंबेडकर – 32 लाख रुपये, अंजली आंबेडकर (पत्नी) – 1 कोटी 15 लाख रुपये, संयुक्त मालमत्ता – 3 कोटी 15 लाख रुपये, त्यांचे  उत्पन्न साधने माजी खासदार असल्याने भारत सरकारची पेन्शन मिळते आहे.

सोबतच वकिलीतून मिळालेले मानधन याबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकांची रॉयल्टी देखील त्यांना मिळते आहे. प्रकाश आंबेडकर यांच्यावर कुठल्याही बँकेचं किंवा वित्त संस्थेचं कर्ज असून, गाडी नसल्याचेही त्यांनी प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले आहे. प्रकाश आंबेडकर यांच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हेगारी प्रकारातील गुन्हा नाही.