शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 18 एप्रिल 2019 (10:12 IST)

विखे, मोहिते-पाटलांचा मोदींवर भरोसा नाही नवाब मलिक

राधाकृष्ण विखे पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील दोघेही भाजपाच्या वर्तुळात दिसतात, मात्र भाजपामध्ये अधिकृत प्रवेश करत नाहीत. याचे कारण स्पष्ट आहे की राधाकृष्ण विखे पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील यांचा पंतप्रधान मोदींवर भरोसा नाही. लोकसभा निवडणुकीत मोदींचा विजय होणार की नाही याबाबत दोघांच्या मनात शंका आहे, म्हणूनच त्यांनी आपल्या मुलांना भाजपामध्ये पाठवले मात्र स्वतः भाजपात पक्ष प्रवेश केला नाही, अशी तिखट प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. आज मोदींच्या अकलुज येथील सभेत विजयसिंह मोहिते पाटील व्यासपीठावर उपस्थित होते, त्यावर मलिक यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.