मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified गुरूवार, 30 जून 2022 (11:19 IST)

Viral Video 70 वर्षीय आजीने गंगा नदीत उडी घेतली

ganga river
हिंदूंसाठी गंगा नदी ही जगातील सर्वात पवित्र नद्यांपैकी एक आहे. गंगा नद्यांच्या काठावर पवित्र तीर्थक्षेत्रे आणि शहरे आहेत. भारतातील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरिद्वारला जगभरातून लोक भेट देतात. भाविक हरिद्वारला येतात आणि गंगेत स्नान करतात.
 
एका 70 वर्षीय महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ हर की पौरी, हरिद्वार येथील आहे. व्हिडिओमध्ये एका वृद्ध महिलेने पुलावरून गंगा नदीत उडी मारली आहे. हे पाहिल्यानंतर लोकांचा काही क्षणासाठी श्वासच थांबला.
 
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका 70 वर्षीय महिलेने असा पराक्रम केला आहे. उंचावर बांधलेल्या हरिद्वार पुलावरून वृद्ध महिलेने गंगा नदीत उडी मारली होती.
 
नदीच्या लाटांसोबत ही महिला वाहून जाऊ नये, असे लोकांना वाटत असले तरी ती गंगामैयाचा आनंद लुटत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. सोशल मीडियावर वृद्ध महिलेचे धाडस पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. ही महिला हरियाणा राज्यातील जिंदे जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.