1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. ट्रेडिंग
Written By
Last Modified: बुधवार, 3 एप्रिल 2024 (12:49 IST)

मुंबईच्या 37 वर्षीय महिलेला योग्य वराची अपेक्षा, फक्त व्हायरल होत असलेल्या अटी नक्की वाचून घ्या

मुंबई मध्ये 10 वर्षांपासून जॉब करत असलेली एक महिला लग्नासाठी वराच्या शोधात आहे. तिचे वय 37 असून वर्षाला चार लाख रुपये कमावते. तिने आपल्या लग्नासाठी मुलाला घेऊन काही अपेक्षा केल्या आहे. तिने  तिची होणारा नवरा कसा असावा या साठी अपेक्षांची यादी केली आहे. आणि काही अटी ठेवल्या आहे. आता ही यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 
 
मुंबईतील एका 37 वर्षाच्या महिलेचा वराची शोध करण्यासाठी दिलेल्या अपेक्षांच्या यादीचा स्नॅपशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या मध्ये तिने वरासाठीची अटी दिल्या आहे. तिच्या अपेक्षांची यादी दाखवणारा एक स्नॅपशॉट सोशल मीडिया एक्स X वर शेअर केला गेला होता. हा आता व्हायरल झाला आहे. 

तिने अपेक्षा करत इंग्रेजीतून मराठीत अनुवाद करून सांगितलं आहे की ही महिला मुंबईत राहते आणि मुंबईत कामाला आहे. तिला मुंबईत स्वतःचे घर, नौकरी, व्यवसाय असणारा जोडीदार पाहिजे. कुटुंब सुशिक्षित असावे. सर्जन किंवा सीए.ला प्राधान्यता आहे. तिला एक कोटी कमावणारी व्यक्ती पाहिजे. 
ही पोस्ट 2 एप्रिल रोजी x वर शेअर करण्यात आली होती. या पोस्टला 1000 हुन अधिक लाईक्स मिळाले आहे. तरही पोस्ट आतापर्यंत 5.5 लाखांहून अधिक वेळा पाहिली आहे. ही पोस्ट पाहून नेटकरी आपापल्या प्रतिक्रिया देत आहे. 
 
  Edited by - Priya Dixit