गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शनिवार, 1 डिसेंबर 2018 (08:57 IST)

प्रयागराजमध्ये शाही स्नान काळात लग्नसोहळ्यावर बंदी

प्रयागराजमध्ये जानेवारी २०१९मध्ये कुंभमेळा सुरू होणार आहे. या कुंभमेळ्यात स्नानाला अधिक महत्त्व दिले जाते. हा स्नान सोहळा तीन महिने म्हणजेच जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च पर्यंत सुरू राहणार आहे. याच पार्श्वभूमीवर योगी सरकारने होणाऱ्या लग्नसोहळ्यावर बंदी घातली आहे. 
 
या निर्णसंदर्भात सरकारने मॅरेज हॉल आणि गेस्ट हाऊस यांना अधिकृतपणे पत्रे पाठवले आहेत. स्नाना पूर्वी आणि स्नाना नंतर विवाह करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे त्यादरम्यान असणाऱ्या लग्नासंदर्भातील सर्व नोंदणी रद्द करण्याचा आदेश देण्यात आला आहे.