बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 जून 2021 (12:32 IST)

महिला डॉल्फिनच्या प्रेमात पडली, लग्न केलं आणि आता पतीच्या मृत्यूनंतर विधवेचे जीवन जगत आहे

आजकाल अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत जिथे लोक फक्त एखाद्या वस्तूंशी लग्न करतात. काहीजण बाहुल्यांशी लग्नही करतात. या यादीमध्ये ब्रिटनच्या शेरॉनचे नाव आहे. शेरॉनने मनुष्याऐवजी डॉल्फिनशी प्रेम करुन लग्न केलं. आता पतीच्या निधनानंतर ती विधवेचे जीवन जगत आहे.
 
जेव्हा 26 वर्षीय शेरॉनने तिच्या पती सिंडीला प्रथम पाहिले तेव्हा तिला समजले की तिचं त्यावर प्रेम आहे आणि त्यासोबतच आयुष्य घालवायचे आहे. शेरॉनचे प्रेम सिंडी ब्रिटनमध्ये नव्हे तर इस्रायलमध्ये राहत होतं. शेरॉनने फक्त सिंडीला भेटण्यासाठी इस्रायलला अनेकदा भेट दिली.
 
यानंतर, 16 वर्ष लाँग डिस्टन्समध्ये राहिल्यानंतर शेवटी शेरॉनने काही निवडक लोकांसमोर सिंडीशी लग्न केले. तिच्या लग्नात शेरॉनने वेडिंग गाऊन घातला होता. तसेच लग्नानंतर शेरॉनने आई लव यू असे सांगून चुंबनाच्या रूपात सिंडीला आपल्या प्रेमाला मोहर लावली.
 
डॉल्फिनशी लग्न केल्याच्या बातमी चर्चेला विषय ठरली. तिच्या लग्नाच्या दिवशी शेरॉन खूपच सुंदर दिसत होती. या लग्नामुळे डॉल्फिन सिंडीसुद्धा आनंदी दिसत होती. दोघांनीही जगासमोर आपले प्रेम व्यक्त केले. या लग्नानंतर शेरॉनने म्हटले होते की तिला डॉल्फिनबरोबर लग्न खरोखर प्रेम आहे आणि प्रेम एखाद्या मनुष्यावर असले पाहिजे हे आवश्यक नाही. हे कोणासोबतही होऊ शकते. ते सिंडीबरोबर झाला आणि आता मी खूप आनंदित आहे.
 
2006 मध्ये सिंडीचे निधन झाले. सिंडीला पोटात काही समस्या होती. पतीच्या मृत्यूच्या बातमीनंतर शॅरोनला धक्का बसला. या धक्क्यातून बाहेर पडण्यासाठी तिला बराच काळ लागला. तिच्या कुटुंबातील सदस्य तिला पुन्हा लग्न करण्यास सांगतात पण शेरॉन म्हणते की ती एक डॉल्फिनची पत्नी आहे आणि ती नेहमी सिंडीचीच राहील. या लग्नापासून शेरॉनबद्दल बरीच चर्चा होती. लक्षाधीश असूनही शेरॉनने पुन्हा लग्न केले नाही आणि ती अजूनही विधवेचे जीवन जगत आहे.