बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: मंगळवार, 12 जून 2018 (08:50 IST)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांची भेट

अखेर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी सकाळी उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांची भेट घेतली आहे. ही बैठक उत्तर कोरियाने अण्वस्त्र नष्ट करावी यासाठीची झाली आहे. जागतिक शिखर बैठक कोरियन युद्धाचा शेवट करणारी ठरणार आहे असे चित्र सध्या आहे. दोघांची भेट एकमेकांना हस्तांदोलन करत  भेटीला सुरुवात झाली. दक्षिण कोरियाचे अमेरिकेतील माजी राजदूत सुंग किम हे अमेरिकेच्या बाजूने चर्चेची सूत्रे सांभाळणार आहेत. तर उत्तर कोरियाचे उपपरराष्ट्रमंत्री चो सन हुई हे उत्तर कोरियाची सूत्रे सांभाळणार असून त्यामुळे बैठक यशस्वी होईल असे आहे. सिंगापूरमधील सेनटोसा बेटावर सकाळी नऊ वाजता (भारतीय वेळेनुसार सकाळी साडे सहा वाजता) डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग यांच्यात शिखर परिषदेला सुरुवात झाली आहे. शिखर परिषदेला सुरुवात करण्यापूर्वी ट्रम्प यांचा आशावाद, तर किम जोंग उन म्हणाले, असंख्य अडथळे पार करुन आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो. या बैठकी कडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. उत्तर कोरियाने अनकेदा दक्षिण कोरिया सह अमेरिकेला युद्धाच्या धमक्या दिल्या आहेत. तर  उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी देशावर एक हाती सत्ता ठेवली आहे. त्यामुळे अमेरिके सोबत ही भेट महत्वपूर्ण ठरली आहे.